आगामी पोळा गणेशोत्सव सणा निमित्तची शांतता कमिटीची बैठक हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे संपन्न!

हिमायतनगर


हिमायतनगर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस प्रशासनाच्या वतीने आगामी पोळा व गणेश उत्सव सणानिमित्त आज दि:-२३/०८/२२ रोजी कर्तव्यदक्ष पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना ताई पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच हिमायतनगर पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक बी. डी भुसनर , तसेच सह पोलिस निरीक्षक बालाजी महाजन यांचा मार्गदर्शना खाली शांतता समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
सदरील शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोळा व गणेशोउत्सव कायद्याचे पालन करुन शांततेने साजरा करण्याचे अव्हान पोलिस प्रशासना तर्फे करण्यात आले, तसेच कर्तव्यदक्ष पोलिस उपविभागीय अधिकारी अर्चना ताई पाटिल यांनी गणेश उत्स्वात काही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने काही अधिसूचना जारी केले आहेत, ते आधी सुचना खालील प्रमाणे आहेत.

गणेश मूर्ति स्थापने चा जागी कोणतेही अनुचित प्रकार घड़ू नये याची पुरे पुर जबाबदारी गणेश मडळानीं घ्यावी त्यांनी त्या गणेश मंडळा तर्फे स्वयंसेवक मंडळ आयोजित करुन त्यांचे देख रेखीत रात्र- दिवस मूर्ति स्थापनेचा जागी पाहणी करायची, डीजे ला प्रवानगी नाही,जर कोणी लावले तर त्याचे आवाज 75 डिसिप्ले पेक्षा जास्त राहु नये पर्यावरण कायद्याचे पालन नाही केल्यास कायद्या प्रमाणे त्यास 5 लाख रुपये दंड, सहा महिन्याची करावासा व शिक्षेचा प्रवधान आहे, गणेश उत्सवात गणेश मिरवाणुकीचा वेळी इतर धर्मयांची भावनाची दखल असे अक्षेपारहय गाने लावू नये, फक्त भगती गीते लवावी, अन्यथा कोणी आक्षेप घेतल्यास किंवा त्याबद्दल काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांचेवर कड़क कार्यवाही करण्यात येईल,

गणेश मंडळाने देखावे सादर करीत असतांना इतर धर्मियांची मने दुखविन्यासारखे दिखावे करू नए, गणपती चे दर्शनास मूली, महिलांची छेळ छाळ होनार नाही याची पुरे पुर दक्षता गणेश मंडळानीं घ्यावी,असे सक्तीचे निर्देश पोलिस प्रशासना तर्फे देण्यात आले आहे.शहरातील अनेक गणेश मंडळांनी आपल्या काही समस्याहीया या आजच्या बैठकीमध्ये सांगितले आहे. या समस्येची पूर्णत निराकरण करण्याचे आश्वासनही मुख्याधिकारी जाधव,व पोलीस प्रशासनाने दिले आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी खऱ्या अर्थाने आगामी पोळा गणेश उत्सव सण साजरा शांततेतसाजरा करण्यासाठी तालुक्यासह,ग्रामीण भागातील अवैध दारूविक्री बंद करावे असे ज्येष्ठ पत्रकार परमेश्वरजी गोपतवाड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारीअर्चना पाटील यांना कळकळीची मागणी केली आहे.

यावरून विचार विनिमय करून
पोळा व गणेशोत्सव या या सणांच्या दिवशी तालुक्‍यासह ग्रामीण भागातील जेवढेहि अवैध दारू विक्रेते आहेत त्यांची यादी तयार करून त्यांना दोन दिवस पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे आणून बसवण्याचे आदेशही पोलीस निरीक्षक बी. डि. भुसनूर यांना दिले आहे.नगरपंचायतीची
यावेळी हिमायतनगर नगर पंचायत चे मुख्याधिकारी जाधव व नगर पंचायत हिमायतनगर चे महाजन , संपूर्ण तालुक्याचे पोलिस पाटिल,सरपंच, ग्रामसेवक, व तसेच हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित नागरिक हिमायतनगर चे मा. उपनगर अध्यक्ष जाविद भाई, माजी जिल्हा परिषद् सदस्य समद खान, फेरोज खान, पत्रकार स, अ,मन्नान सय्यद,सरदार खान, उदय देशपांडे, शिवसेना तालुका अध्यक्ष राम भाऊ ठाकरे, नागराध्यक्ष -कुणाल राठोड, भाजपचे तालुकाध्यक्ष – आशिष सकवान, राम सूर्यवंशी, बाजार समितीचे माजी संचालक गजानन तुप्तेवार, मा. प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल अखिल, संजय माने, शेख रहीम , सर्वपक्षीय आजी-माजी कार्यकर्ते असे अनेक प्रतिष्ठित नागरिक , असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन पत्रका मन्नान सय्यद यांनी केले, व सह पोलिस निरीक्षक महाजन यांनी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार पोलिस पाटिल सरपंच ह्या सर्वांचे आभार मानले आहे.