
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी
हदगाव हिमायतनगर मतदारसंघांमध्ये फार वर्षापासून काँग्रेस शिवसेनेच्या अवतीभवती तालुक्याचे राजकारण फिरत होते मागील दहा पंधरा वर्षापासून मुळचे काँग्रेसबधी सत्ता असलेल्या माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसने विधानसभेचे तिकीट नाकारल्यामुळे नाराज होऊन त्यांनी शिवसैनिक समर्थकांसह काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते मा सुभाष वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्यास सुरुवात केली व हदगाव शिवसेना तालुका प्रमुख म्हणून नागेश पाटील यांची नियुक्ती केली व त्यानंतर विधानसभेचे तिकीट देण्यात आले या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माधवराव पाटील जळगावकर विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर अशी आमने-सामने लढाईमध्ये माधवराव पाटील जळगावकर यांचा प्रभाव झाला आणि नागेश पाटील हे आमदार झाले त्या विधानसभा मध्ये जाऊन बसले तालुक्यातील राजकीय घडामोडी मध्ये जवळगावकर आष्टीकर हे घराणे एकमेकाविरुद्ध कट्टर म्हणून तालुक्यात प्रचलित होते जळगावकर घराणे हे काँग्रेसी एकनिष्ठ आहेत तसेच आष्टीकर घराणे हे सध्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत जळगावकर व आष्टीकर या दोघांची घराण्यामध्ये आज पर्यंत एकमेकांसमोर दिसून येत नव्हते तसेच हिमायतनगर तालुक्यातील गावा गावात काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते दोन्ही एक मेकाच्या विरोध राहताना दिसुन येत होते , पण काल झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हिमायतनगर हदगाव तालुक्यातील माझी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती संचालक पदी बिनविरोध निवड झाली त्यांचे काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जळगावकर व आष्टीकर घराण्याची कट्टर विरोधी आमदार माधवरावपाटील जळगावकर यांनी एकत्रित येऊन राजकारण केल्यामुळे तालुक्यातील राजकारणा मध्ये व कार्यकर्ते शिवसेनेच्या व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्माण होत आहे कारण की त्यांनी काल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माधवराव पाटील जळगावकर यानी सहकार्य करुन महाविकास आघाडी धर्म पाळलाव नागेश पाटील आष्टीकर एकत्रित येऊन एकमेकांना पेढे खावू घालत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चेचे व संभ्रमाचे वातावरण दोन्ही तालुक्यात निर्माण झाले आहे असे दिसून आले
