
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी
भाजपा कार्यालय नांदेड येथे जिल्हा अध्यक्ष मा व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा महिला मोर्चा च्या वतीने विविध आघाड्याचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . प्रमुख उपस्थिती भाजपा संघटनमंत्री गंगाधरराव जोशी,जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्राताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले त्यावेळी हदगाव तालुका अध्यक्ष निळू पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस संगीता मेरगेवार,केतकी चौधरी जिल्हा सरचिटणीस,देगलूर तालुकाध्यक्षा मिनाक्षी बिरादार, देगलुर शहराध्यक्षा राधिका पटवारी, बिलोली तालुका अध्यक्षा शिवकन्या सुरकुलावार,लोहा तालुका अध्यक्षा सविता सातेगावे, भाजपा महिला मोर्चा नवनिर्वाचित पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते
