सवना दारुबंदीसाठी महिलाचा एल्गार !पोलिस निरीक्षकाकडे अवैध दारुबंदीची केली मागणी.


प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर शहरांसह ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. असे निवेदन सवना येथिल काही महिलांनी एकत्र येऊन पोलिस निरीक्षक भगवान कांबळे व पोलीस उपनिरीक्षक महाजन साहेब यांना निवेदन देऊन दारुबंदी साठी मागणी केली गेली काही दिवसांपासून गावांमध्ये अवैध दारू विक्रीला उदान आले आहे याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे का असा प्रश्न देखील महिलांनी केला आहे सवना हे १५ ०० ते२००० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये अवैध दारू विक्री मुळे गावातील वातावरण दुषित निर्माण होऊ लागले महिलांच्या छेडछाड मध्ये वाढ होऊ लागली त्यामुळे गावातील काही महिला एकत्र येऊन दारू बंद करण्याची मागणी त्यांनी केली जर का येत्या दोन-तीन दिवसांत दारू बंद नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीने दारू बंद करु असा इशारा महिलांनी येवेळी पत्रकारांशी बोलताना दिला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकारमान्य देशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री किंमतीपेक्षा जादा दराने विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. हिमायतनगरतालुक्यातील सवना व हिमायतनगर पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या मौजा सवना.जिरोणा .वाडी तांडा या ग्रामीण भागासह स्थानिक पालांदूरात सुद्धा देशी दारू पासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित वेळेत सर्रास मिळत आहे.या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत.पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.भर चौकात दारुची होते विक्रीअवैध दारु विक्रीचा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला सूचना देऊनही या प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमका कुणाचा? असा सवाल ग्रामवासीयांतर्फे विचारला जात आहे. सवना करताना तीनही रस्त्यांवर अवैध देशी दारूची दुकाने दिसून येतात या वेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा सर्कल प्रमुख प्रमोद भुसाळे विशाल आंगुलवार परशुराम विठ्ठलवाड योगेश आंगुलवार त्याच बरोबर काही महिला देखील उपस्थित होते.