
👉🏻 रात्रीच्या वेळात रेतीची अवैध वाहतूक तेजीत
👉🏻 तलाठी व मंडळ अधिकारी मात्र हप्ते घेऊन गप्प ! जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी,
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
तालुक्यातील मौजे विरसनी नदीपात्रातून दिवसा व रात्री ला रेतीची अवैध वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात सुरू असून सुद्धा हिमायतनगर शहरातील महसूल व तहसील प्रशासन मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे विरसनी रेती घाटावरून दिवसा व रात्रीच्या वेळी पंजाब.. व इतर बड्या वाळूमाफिया कडून अवैध रेतीची खुलेआम वाळू तस्करी केली जात आहे या वाळू माफिया कडे तलाठी शिंदे व मंडळ अधिकारी पंगे यांचे अंकुश नसल्याने हे प्रकार घडत आहेत त्यामुळे ह्या बाबी कडे नांदेड चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विपिन इटणकर साहेब यांनी लक्ष देण्याची मागणी येथील पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली आहे
तालुक्यातील मौजे विरसनी येथील रेती पेंढा वरून रात्रदिवस अवैध रेतीचा उपसा सुरू आहे या कडे हिमायतनगर महसूल विभागातील तहसिलदार व या सज्जाचे तलाठी व मंडळ अधिकारी हे साफ दुर्लक्ष करीत असल्याने ? येथील रेती माफिया कदामाची सांगड प्रशासनाशी ! असल्याने ते कुणालाही न घाबरता सर्वांना हप्ते देऊन आम्ही हा धंदा करत आहोत अशा भाषेत बोलत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दिवसरात्र चोरून घेत आहेत ! तालुक्यात सध्या कोरोणाच्या संसर्गामुळे ब्रेक द चेन या नावाखाली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉक डाऊन सुरू आहे तालुक्यातील प्रत्येक जण मा. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या नियमाचे पालन करीत आहेत पण येथील रेती माफिया कडून कुठल्याच नियमांचे पालन होत नाही ते रात्रंदिवस रेती चोरी करून तालुक्यातील गोर गरीब घरकुल धारकांना बे भाव दराने रेती विक्री करत आहेत
कोरोणा नियमाची पायमल्ली करून येथील रेती माफिया विरसनी गावात मोठ-मोठे रेतीचे साठे जमा करून ठेवले आहेत काही दिवसा पूर्वी येथील कर्तव्यदक्ष तलाठी मेतलवाड यांनी येथील वाळू वाहतूक रोखल्यांने त्यांची राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू माफियांनी त्यांची तात्काळ बदली केली त्यानंतर येथे आलेल्या तलाठी साहेबांशी हात मीळवणी करून येथे आता वाळू वाहतुक अहोरात्र चालू झाली आहे पण आता येथील महसूल प्रशासन ह्या कडे लक्ष देत नाही , गावात मोठ्या प्रमाणात रमाई घरकुल आवास योजने सह पंतप्रधान आवास योजने चे कामे सुरू आहेत त्यासाठी लागणारी रेती येथील नदीपात्रातून तस्करी करून ती रेती गावातील व तालुक्यातील गोरगरीब जनतेला पाच ते सहा हजार रुपये याप्रमाणे विकत आहेत व लाखो रुपयांची उलाढाल रोज करत असल्याने गावातील जो कोणी यांच्या विरोधात आवाज उठवेल त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत ! अशा वाळू चोरट्यांना मा.जिल्हाधिकारी विपिन इटनकर साहेब , उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसीलदार यांनी यांचे रीतीचे साठे तात्काळ जप्त करून ते येथील गोर गरीब घरकुल बांधकाम करणाऱ्यां लाभार्थ्यांना उपलब्ध करुण द्यावे व ह्यांच्या वर कार्यवाही करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील सुजान पर्यावरण प्रेमी नागरिकांतून होत आहे
चौकट.
” आता कुठे गेले राजकीय नेते “
मागील काळात हिमायतनगर शहरात रेतीची वाहतूक जोरात सुरू होती तेव्हा हिमायतनगर शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांनी व पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी वाळू माफियांच्या विरोधात अनेक तक्रारी व आंदोलन व उपोषण केले होते व त्यानंतर सुद्धा ही या वाळूमाफियांची अवैध वाळू वाहतूक चालूच राहिली पण आता ते कार्यकर्ते कुठे गेले ? असा आरोप हिमायतनगर शहरातील सुजाण नागरिक विचारात आहेत
तहसीलदार यांचे साफ दुर्लक्ष !
हिमायतनगर शहरात रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक जोमात सुरू आहे पण हिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड साहेब हे नांदेड मुक्कामी राहत असल्यामुळे येथील वाळू माफियांना त्यांचे खूप मोठे अभय असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे ? त्यामुळे ह्या बाबी चा मा.जिल्हाधिकारी ह्यांनी विचार करावा अशी मागणी होत आहे
