हिमायतनगरातील जनावरांचा कोंडवाडा गायब करण्याला जबादार कोण..?


👉🏻माजी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या काळात कोंडवाडा गायब झाल्याचा आरोप..!
👉🏻जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी..?
👉🏻मोकाट जनावरांच्या हैदोसाने शेतकरी व व्यापारी त्रस्त

हिमायतनगर प्रतिनिधी


शहरातील मोकाट जनावरांनी शेतकर्यांना हैराण करून सोडले असून, शेतातील उभ्या पीकात घुसून हैदोस माजवीत असल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. आजघडीला शेतीमध्ये तूर काढणीचे कामे चालू असताना रात्रीला हि मोकाट जनावरे शेत शिवारात घुसून धुडघूस घालत आहेत. या जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकतो म्हंटलं तर शहरातील जुना कोंडवाडा मागील काळातील राजकीय नेत्यांनी तो गायब केला .? अशी शंका शेतकरी व शहरातील नागरिकांना येऊ लागली आहे. या बाबत दि.14 जानेवारी रोजी शेख हजर शेख उमर हजर यांनी तहसीलदार यांच्या कडे एक लेखी तक्रारी केली व न. प. चे उपनगराध्यक्ष मो.जावेद हाजी अब्दुल गनी यांनी सुधा ह्या बाबी ची दाद जिल्हाधिकारी यांच्या कडे मागितली आहे
अगोदरच बळीराजा पावसाच्या अवकृपेमुळे पिकांच्या सुरक्षेच्या व होणार्या उत्पन्नाच्या चिंतेत त्रस्त झाला असून, त्या चिंतेत शहरातील मोकाट गुरांनी भर पडली आहे. शेतातील उभ्या पिकात हि मोकाट जनावरे बिनदिक्कतपने वावरून शेतातील खरीप हंगामात सोयाबीन, ज्वारी व इतर पिकांवर ताव मारून नुकसान करत आहेत. याबाबत अनेकदा शेतकर्यांनी गुरांना पकडून कोंडवाड्यात टाकन्यासाठी पुढाकार घेतला मात्र हे गुरं पकडून टाकण्यासाठी काही राजकीय मंडळी नी शहरातील कोंडवाडा गायब करून त्या ठिकाणी अन्य प्रकररचे दुकान उभारण्यात आले आहे. या प्रकारामुळे शेतकरी नागरपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेकांनी काही नगरसेवक सदस्य व प्रशासनाकडे संपर्क साधला असता गुरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्यासाठी इतर ठिकाणी कोंडवाडा बांधला जाईल असे सांगण्यात आले होते.
तातडीने नगरपंचायत प्रशासनाने या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा यासाठी तात्काळ कोंडवाडा निर्माण करून शेतकरी, नागरिक, व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा आगामी नगरपंचायत निवडणुकीत सत्त्तेत असल्यानं त्यांची जागा दाखविण्यासाठी मतदार म्हणून विचार करावा सर्वांना विचार करावा लागेल असा इशारा अनेकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिला आहे. कारण शहरातील पूर्ववत कोंडवाडा गायब करण्यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांची मिलीभगत असल्याने चक्क कोंडवाडा गायब केला, याबरोबर नगरपंचायतीच्या मालकीचे किती भूखंड गायब झाले. याचा तपास जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ लावून यास जबाबदार राजकीय नेते कि.. प्रशासकीय अधिकारी..? हे जनतेसमोर उघड करावे अशी मागणी मोकाट जनावरांच्या हैदोसाने त्रस्त झालेल्या शेतकरी, शहरवासीय नागरिक व व्यापारी वर्गातून केली जात आहे.

चौकट
(तात्काळ कोंड्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आत्मदहन करेल :शेख हजर शेख उमर हजर…)
हिमायतनगर शहरालगत असलेल्या शेतीमध्ये शहरातील मोकाट जनावरे जाऊन सर्व उभे असलेल्या पिकांची नासधूस करत आहेत त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे व एक तर शहरात कोंडवाडा नाही त्यामुळे ही मोकाट जनावरे बांधायची कुठे ? असा संतप्त आरोप उमर हजर यांनी केला त्यामुळे तात्काळ नगरपंचायतीने शहरात कोडवाड्याची व्यवस्था केली नाही तर नगरपंचायत समोर आत्मदहन करेल असा इशारा त्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिला