

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी
केंद्रिय मंत्री नितिनजी गडकरी साहेब व विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतुन दानशुर कर्तव्यदक्ष लोकभिमुख प्रविण पोटे पाटिल यांनी शासकीय यंत्रणेच्या भानगडीत न पडता लोकांना जीवनदान देण्या करीता स्वतः स्वखर्चातुन तात्काळ मदत करावी नितीनजी,देवेंद्रजी यांच्या विनंतीला मान देऊन अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोवीड सेंटर बी विंग येथे ऑक्सिजन प्लांट PSA प्रणाली वर चालनारा पहिला 200m3 कॅपॅसिटी चा स्वदेशी Summits Hygronics Pvt. Ltd.Coimbatore 100% capacity प्लांट कार्यान्वित होत आहे. याला बाहेरुन कोणतेही ऑक्सिजन सिलेंडर आणुन लावण्याची गरज नाही, हा सेल्फ़ ऑक्सिजन जनरेशन करणारा प्लांट आहे. रोज 24×7 तास प्रत्येक 40 बेडला पाईप द्वारे कायम स्वरुपी आजीवन ऑक्सीजन देणारा प्लांट असुन त्याची कींमत 65 लक्ष रु आहे. हा प्लांट रुग्णांना नियमित सेवा मिळावी म्हणून याची आजीवन देखभाल व मेंटनन्स प्रवीण.आर. पोटे पाटिल ट्रस्ट करणार आहे. ऑक्सीजन प्लांटच्या कामाला सुरुवात झाली असुन 8 आठवड्यामध्ये रुग्णांच्या सेवेत येणार आहे.
हा ऑक्सिजन प्लांट स्वखर्चातुन(खाजगी) पी. आर.पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट, स्व.सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटिल यांच्या स्मरणार्थ 65 लक्ष रु किंमतीचा ऑक्सीजन प्लांट स्वखर्चातुन(खाजगी) अमरावती सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल बी विंग येथे कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याचा धनादेश जिल्हाअधिकारी यांना हस्तांतरीत करण्याकरीता विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहे.
सध्याच्या स्थितीत कोरोनाचा मोठा उद्रेक होत असून रुग्णांकरिता ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा अमरावती जिल्ह्यामध्ये भासत आहे. जिल्ह्यातील ही कोवीडची भयावह परिस्थिती लक्षात घेऊन लोकांचे प्राण वाचावे या दृष्टिने पी. आर. पोटे पाटिल ट्रस्ट द्वारे दानशुर व्यक्तीमत्व, कर्तव्यदक्ष प्रविण पोटे पाटिल यांनी स्वखर्चातुन (खाजगी) ऑक्सिजन प्लांट देण्याचा निर्णय घेतला. आज रोजी जिल्हाअधिकारी व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शैल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात, कंपनीचे एक्स्पर्ट व मित्रपरीवार यांनी जाऊन सुपर स्पेशालीटी बी विंग येथे भेट देऊन ऑक्सीजन प्लांट करीता जागा निश्चित केली असून या प्लांटच्या पूर्वतयारी कामाला सुरवात सुद्धा झाली आहे. प्रवीण. आर. पोटे पाटिल ट्रस्ट हा ऑक्सिजन प्लांट स्वखर्चातुन करीत असल्या मुळे सर्व ज़िल्हातील नागरीक याचे कौतुक करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षितेकरीता व सोयीकरिता प्रवीण. आर. पोटे पाटील ट्रस्ट सेवाभावी कार्यात सदैव तत्पर असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत नेहमीच आहे.
प्रविण पोटे पाटिल यांनी आमदार या नात्याने वेळेचे महत्व लक्षात घेता व सद्यस्थितीत वेळेचे भान ठेवता कोणत्याही सरकारी माध्यमातून किंवा आमदार निधितुन, CSR फ़ंडातुन मदत न घेता स्वखर्चातुन (खाजगी) हा ऑक्सिजन प्लांट जनतेसाठी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग व जनता जनार्दन प्रविण पोटे पाटिल व त्यांच्या मित्र मंडळीचे कौतुक व आभार व्यक्त करीत आहे..
हा प्लांट चालु होताच परत एक bottling प्लांट गरजे नुसार परतवाडा,दर्यापुर, वरूड येथे देण्याचा मानस आहे, हेसुद्धा आमच्या ऐकण्यात आहे..
