
प्रतिनिधी: लता फाळके /हदगाव
2020- 21 चा खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची पेरणी केली होती. परंतु ही पिके काढणीस आल्या वेळेस अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. यावेळी काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या व काही शेतकऱ्यांना विमा मिळाला देखील परंतु नेटवर्क चा प्रॉब्लेम मुळे व पावसाळ्यात काही ठिकाणी लाईट खंडित झाल्यामुळे बरेच शेतकरी तक्रार करू शकले नाहीत व त्यामुळे ते पीकविमा मिळण्यापासून वंचित राहिले. बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रारीची माहिती नसल्यामुळे ते शेतकरी सुद्धा तक्रार करू शकले नाही. तक्रार केलेले शेतकरी पात्र ठरतात व त्याच भागातील काही शेतकरी तक्रार न केल्यामुळे अपात्र ठरतात हा मापदंड अनाकलनीय आहे. सदरील भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सरसकट विमा देण्यात यावा यासाठी शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या साठी पावले उचलावीत अशी विनंती केली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश घंटलवार शिवसेना तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री शामराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भगवानराव शिंदे, राजेंद्र जाधव तळणीकर, माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय पवार, तालुका संघटक अवधूत देवसरकर,सुभाषराव जाधव मनूलेकर,मा.जी. प. सदस्य दिलीपराव बास्टेवाड, अशोकराव कदम ,साहेबराव शिंदे जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर ,विजय बास्टेवाड, माजी पंचायत समिती उपसभापती शेषराव कदम,पंचायत समिती सदस्य डॉ. भगवानराव निळे, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रभाकर पत्तेवार, विलासराव व्यवहारे, काशीराव कदम, दीपक मुधोळकर ,पंजाब तावडे, मल्लिकाअर्जुन मुखेडी, सुधाकर महाजन ,संभाजी खंदारे, श्रीधर कदम,तुकाराम जाधव व शिवसैनिक उपस्थित होते.
