
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये नागरीकांना लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सोशल डिसटन्स पालन देखील केले जात नाही असे आढळून आले जर यांवर नियंत्रण नाही ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे
आणि गर्दीचे जास्त.लसीकरण केंद्रा पाहायला मिळाले. कमी डोस (Dose) उपलब्ध असल्याने शहरातील मोजक्याच केंद्रांवर लसीकरण (Vaccination) होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बंद असलेल्या केंद्रावरील नागरीकांनी दुसऱ्या केंद्रांवर धाव घेतल्याने गर्दी झाली होती. केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून नगर पालिकेला आवश्यक तेवढ्या लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणातील गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज जवळपास काही पहिला डोस घेऊन दीड महिना झाला तरी देखील आजूनही दुसरी लस घेण्यास विलंब होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जर का नागरिकांना दुसरी लस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरीकांना कोरोनाची भिंती निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये दुसऱ्या लसची व्यवस्था प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये केली तर एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी होत जाईल आणि लसीकरण घेणार्याची सख्या देखील वाढेल त्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये लसकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
