आंदेगाव पाणी पुरवठा योजना कुचकामी ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम,गावकऱ्यांनी घेतला आक्षेप


प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील गावाची पाणी टंचाई लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत जवळपास एक कोटी 20 लाख रुपयांची नळ योजना मंजूर झाली आहे….
सादर योजनेचे काम एका गुत्तेदारांने जि. प. पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सुरु करून पाच वर्षांचा कालावधी होत आहे परंतु अद्यापर्यंत अर्धवट अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.
सदरील योजना ही 2015 पासून ठप्प असल्यामुळे चालू वर्षात पाणी टंचाईच्या काळात ग्रामस्थांना भटकावे लागत आहे.
सदर गुत्तेदाराणे पाच पर्षांपुर्वी कामाला सुरुवात केली होती त्या मध्ये एका टाकीचे व विहिरीचे काम पूर्ण झाले आहे आणि एक टाक अर्धवट अवस्थेत, असे जवळपास 50 टक्के काम झाले असून ते पण अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे झाले आहे असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत..
संबंधित अधिकारी व गीत्तेदाराशी पाणीपुरवठा योजनेचे काम का बंद पडले अशी विचारांना केली असता उडवाउडविचे उत्तर मिळत असल्याचे गावातील युवक, दयानंद थोटे यांनी सांगितले
रखडलेली योजना लवकरात लवकर सुरु करावी अन्यथा आम्हा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाचा वापर करावा लागेल असा सवाल येथील गावकरी…
जेष्ठ नाकारिक माधवराव थोटे, पोलीस पाटील निळकंठे, माझी सरपंच दत्ता लक्ष्मण गटकवाड, सेवानिवृत्त फौंजी, चिमणाजी थोटे, दया थोटे, लक्ष्मण बड्डेवाड,
रामदास पोलसवाड यांनी केला आहे.