
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा ( बु) सामाजिक कार्यात सदैव आपली मान उंचावून एक आदर्श गावासमोर ठेवून आज आमर आहेत असे समाज सुधारक कै. शेषेराव दत्तराव माने जे समाजात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजाचे काही देने असते अन ते प्रत्येकाने दिले पाहिजे या सिद्धांतावर जगलेले कै शेषराव दत्तराव माने पोटेकर यांची उध्या रोज शूक्रवार चौथ्या पुण्यतिथी. या निमित्ताने दि ११ डिसेंबर रोजी रात्री 9 ते 12 हरी कीर्तन व 12 ते 5 भजन आशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक गजानन माने यांच्या कडून समजते.
पोटा परिसरात सुपरिचित असलेले व शून्यातून विश्व निर्माण करणारे,केंद्रसरकरची नोकरी करीत करीत उत्कृष्ट शेती करणारे,एक मनमिळावू,समाजसेवक,गोरगरिबांना मदतकरणारे असे एक उद्दात हेतू उराशी बाळगून वडिलांचे निधन झाल्यावरही घरची धुरा अगदी व्यवस्थितपणे जवळपास 40 लोकांचे कुटूंब चालवणारे घराला घरपण देण्यासाठी सतत झगडणारे माने घराण्याचे दैवत पोटा गावासाठी एक आदर्श, अभिमान ची व्यक्ती म्हणजे कै.शेषराव दत्तराव माने पोटेकर यांची शुक्रवारी चौथ्या पुण्यतिथी निमित्ताने शुक्रवार दि ११ रोजी रात्री ठीक 9 ते 11 ह.भ.प. श्री दिगंबर महाराज नखाते पाटील परभणी कर यांचे हरी कीर्तन व 11ते 5 भजन असा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी परिसरातील सर्व नामांकित भजनी मंडळी सहभागी होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आशी विंनती आयोजक . काँग्रेस हिमायतनगर ता. उपाध्यक्ष गजानन माने यांनी केली आहे.
