हिमायतनगर येथील राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयात स्व. डॉ शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी

आज हिमायतनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व डॉ शंकरराव चव्हाण महाराष्ट्र चौथे मुख्यमंत्री व भारत सरकारचे गृहमंत्री म्हणून कार्यरत होते आज या महान थोर व्यक्तींची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली . यावेळी उपस्थित
हि.नगर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात भारताचे गृहमंत्री स्व.शंकरराव चव्हाण साहेब जयंती साजरी करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर, शहर अध्यक्ष संजय माने, जिप सदस्य सुभाष दादा,बँक संचालक गणेशराव शिंदे,सभापती डॉ. प्रकाश वानखेड़े,सेवादल अध्यक्ष राम राव सूर्यवंशी, मा.अ ताडेवाड सर,रफीक सेठ,मा. नगराध्यक्ष अखिल भाई, माजी जि.प सदस्य समद भाई,मा.नगरसेवक शे. रहीम सेठ,मा.नगरसेविका लोने बाई,सुभाषराव शिंदे,गोविंद आप्पा बंडेवार,प्रवीण कोमावार,बबू पाटिल,विठल हरडफ़कर,पंडित ढोने,पवन बंडेवार,गजानन मादसवार उपस्थित होते
डॉ शंकरराव चव्हाण यांचे आई वडील
लक्ष्मीबाई-भाऊराव हे माता-पिता, ज्येष्ठ बंधू नारायणराव आणि मार्गदर्शक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शाश्वत संस्कारांच्या मुशीतून शंकररावजींचे व्यक्तिमत्त्व घडले होते. महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो ठसा महाराष्ट्राच्या पाटबंधारे क्षेत्रावर उमटविला, तो काळालाही मिटविता येण्यासारखा नाही. शंकररावजींनी विविध लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून कोरडवाहू शेतीत रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविली. विष्णुपुरी प्रकल्प योजना आणि जायकवाडी प्रकल्प योजना ह्या तर जणू शंकररावांच्या मानसकन्याच आहेत. अनेक अडचणींवर मात करून शंकररावांनी हे पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास नेले. या प्रकल्पांबरोबरच कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, तितरी, सूर्या, अप्पर वर्धा, पेंच, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, निम्न तेरणा, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, नांदूर मधमेश्वर, लेंडी, खडकवासला, इटियाडोह, पूर्णा, मुळा, काळमावाडी, गिरणा, घोड, सुखी इ. पाटबंधारे प्रकल्पांच्या कालव्यांतून वाहणारे पाणी शंकररावांच्या कर्तृत्वाची गाणी गात आहे. या क्षेत्रात त्यांनी जो अमीट ठसा उमटविला, हे प्रकल्प सिद्धीस नेण्यासाठी शंकररावजींनी जे भगीरथ प्रयत्न केले, त्यामुळे शंकररावजी ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या ‘जलसंस्कृतीचे जनक’ असाही शंकररावजींचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो, तो अगदी यथार्थ आहे. पैठणचा जायकवाडी प्रकल्प होऊ नये, यासाठी विरोधकांनी अगदी रान पेटविले होते. त्यांचा विरोध पत्करून शंकररावजींनी ‘नाथसागर’ साकार केला. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचे डोळे आता पन्नास वर्षांनी उघडले आहेत. परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्याबरोबरच औरंगाबाद शहराला पिण्याचे पाणी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही पाणी याच नाथसागरातून पुरविले जाते. आज औरंगाबाद शहराचा जो औद्योगिक चेहरामोहरा बदलून गेला आहे, त्या विकासाचे आद्य शिल्पकार खर्या अर्थाने शंकररावजीच ठरतात. 
जायकवाडी आणि विष्णुपुरी प्रकल्प म्हणजे शंकररावांनी मराठवाड्याच्या तृषार्त मातीला बहाल केलेले दोन अमृतकुंभ आहेत, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ‘रान पेटविणे’ ही जशी क्रांती आहे, तशीच ‘रान भिजविणे’ हीसुद्धा एकप्रकारे क्रांतीच आहे. या अर्थाने शंकररावजींचे जलसिंचनाच्या क्षेत्रातील कार्य क्रांतिकारी ठरते.