
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर
हिमायतनगर| शहरापासून हाकेच्या अंतरावरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून बिनदिक्कतपणे रेतीचे उत्खनन व चोरट्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून, गरजू घरकुल धारकांना अव्वाच्या सवव दराने रेती घेण्याची वेळ आली आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरु असताना देखील महसुलाचे अधिकारी, कर्मचारी केवळ आपल्या स्वार्थ साधून शासनाच्या तोजोरीवर डल्ला मारत आहेत. परिणामी पर्यावणाला बाधा पोंचत असून, यामुळे नदीपात्र कोरडे होऊन नदीकाठावरील नागरिकांनी पाणी टंचाईच्या झाला सोसाव्या लागत आहेत. याकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी लक्ष देऊन हिमायतनगर येथील तहसील कार्यालयांतर्गत चालू असलेल्या रेतीच्या गोरखधंद्याला आला घालावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.
पैनगंगा नदीकाठावरील एकही वाळू घाटाचा लिलाव मागील अनेक वर्षांपासून झालेला नाही असे असताना देखील वाळूची तस्करी करणारे ट्रैक्टर चालक महसूल विभागातही तलाठी, मंडळ अधिकारी याना हाताशी धरून महिनेवारी हप्ता देऊन राजरोसपणे दिवस -रात्र वाळूचे उत्खनन करून वाहतूक करत आहेत. सध्या येथील तहसीलदार हे प्रकृतीमुळे सुट्टीवर आहेत, याचा फायदा घेत कामारी, वीरसनी, दिघी, एकंबा, धानोरा, वारंगटाकळी, कोठा, रेणापूर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्लीसह इतर वाळू घाट परिसरात कार्यरत असलेल्या सज्जाचे तलाठी यांच्या आशीर्वादाने अमाप पद्धतीने वाळूचे उत्खनन करून गोरगरिबांना ८ ते ९ हजार ब्रास दराने वाळूची विक्री करत आहेत. परिणामी घरकुलासाठी मंजूर झालेला निधी रेतीच्या खरेदीमध्ये खर्च करावा लागत असल्याने घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ प्रसंगी व्याजी दिडी काढण्याची वेळ घरकुल लाभार्थ्यांवर आलेली आहे.
शासनाने घरकुल धारकांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देऊन नदीकाठावर सुरु असलेल्या अवैद्य रेतीच उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात आणि पर्यावणाला निर्माण होणारी बाधा थांबवून भविष्यात पाणी त्यांची निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करावे. तसेच याबाबतीत आजी-माजी राजकीय नेत्यांनी देखील आपल्या नजीकचा कार्यकर्ता आहे म्हणून रेती माफियांना अभय न देता प्रशासनाच्या उत्पन्नांत भर टाकण्यासाठी प्रशासनाला सक्त सूचना देऊन पर्यावरणाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि रेतीच्या संकटात अडकलेल्या घरकुल धारकातून केली जात आहे.
रेतीच्या उत्खननाकडे मराठवाड्यासह वीदर्भ प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
विदर्भ – मराठवाडयाच्या सीमेवरील पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा ठिकठिकाणच्या रेतीघाटावरून केला जात आहे. असे असताना देखील विदर्भ हद्दीतील तहसील प्रशासन याकडे स्वार्थापोटी दुर्लक्ष करत असल्यामुळे कि काय वाळू माफियांचा धुडघूस नदीपात्रातील रेती घाटावर सुरु आहे. एवढेच नाहीतर काही ठिकाणी रेती तस्करांनी चकाकी जेसीबी मशीनद्वारे नदीमध्ये वाहने उतरण्याची सोया व्हावी म्हणून रास्ता सुद्धा तयार केला आहे. हा प्रकार संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना माहित असताना देखील आर्थिक हव्यासापोटी रेतीमाफियांना अभय देत असल्याने पैंगणग नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आजघडीला नदीपात्रातील पाणी पूर्णतः आटल्याने मुक्या जनावरं अंडी नदीकाठावर अवलंबून असलेल्या गावकर्यां पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहेत. यास मुख्य कारण म्हणजे अवैध्य रित्या होणारे रेतीचे उत्खनन आणि त्यांना अभय देणारे उमरखेड – हिमायतनगरचे तहसील प्रशासन जबाबदार असल्याच्या संतपजनक प्रतिक्रिया नदीकाठावरील नागरिक व पाणी टंचाईने हैराण जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.
इसापूर धारण १०० टक्के भरूनही पाणी सोडले जात नाही
हिमायतनगर – उमरखेड शहराजवळून वाहणारी पैनगंगा नदीला पाणी नसल्याने नदी पात्र वाळवंट सारखं कोरडं पडल आहे. यंदा इसापूर धारण १०० टक्के भरलेले असताना देखील एप्रिल महिना सुरू झाला तरी पैनगंगा नदीत अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. आजघडीला पिण्यासाठी पाणी नाही. आणि पावसाळ्यात नदी काठवरिल गावकऱ्यांना पूर येणार असल्याने सतर्क रहा, कोणत्याही वेळी गेट सोडण्यात येतील असे सांगितले जाते. आजच्या परिस्थितीत गांजेगाव फुला पासून ते बोरी फुला प्रयन्त आणि सिरपल्ली ते – वारंगटाकळीपर्यंत नदीला पाण्याचा थेंब नाहि. त्यामुळे नदीकाठावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांना व मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन पैनगंगा नदीत इसापूर धरणातून तात्काळ पाणी सोडून शेवटच्या टोकापर्यंत येईपर्यंत चालू ठेवावे. अशी मागणी माजी सरपंच राजू पाटील शेलोडेकर यांनी केली आहे.
