
हिमायतनगर प्रतिनिधी
नांदेड जिल्हा सह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णा चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे ही बाब अतिशय गंभीर असून शासनाने आखून दिलेल्या कोरोना संदर्भातील नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सर्वच नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घेण्याचे असे आव्हान माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले आहे
गेल्या आठवड्याभरात नांदेड जिल्ह्या सह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे कोरो ना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नांदेड जिल्हा प्रशासनाने अंशतः गर्दी नियंत्रण करण्यासाठी जे निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाला सहकार्य करून आपण सर्वांनी हे निर्बंध पाळावे व ह्या आजारावर प्रतिबंध म्हणून जे लसीकरण सुरू केले आहे त्या लसीकरणाचा सर्वच नागरिकांनी जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन कोरो ना प्रतिबंध लस अवश्य घ्यावी असे कळकळीचे आव्हान हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हे लसीकरण घेऊन सर्व जनतेस आव्हान केले आहे
माजी आमदार नागेश पाटील यांनी 12 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे जाऊन कोरोनाच्या लशीचा पहिला डोस घेतला देशभरात गेल्या एक मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे कोरोना लसीबाबत कुठल्याही प्रकारची भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे काहीच कारण नाही ही लस घेताना कुठल्याही प्रकारची भीती नाही त्यामुळे आपण सर्वजण ही लस घेण्यास पात्र आहोत त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी ही लस लवकरात लवकर घेऊन आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे नम्र आव्हान माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी केले आहे
