

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज सकाळी तिरंगा ध्वज रॅली काढण्यात साडेसात वाजता आली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाची व्यापक प्रमाणात जाणीव जागृती सामान्य नागरिकांमध्ये करण्यासाठी शाळेच्या वतीने ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी या रॅलीसाठी भारत देशाचा, क्रांतिकारकांचा व राष्ट्रध्वजाचा गौरव करणारी घोषवाक्ये तयार करून त्याचा जयजयकार रॅली दरम्यान केला. ग्राम पंचायत येथे ध्वज्या रोहन केला . घोषवाक्यांचा जयघोष, तिरंगा घरोघरी लावण्यासाठी केलेले आवाहन यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या तिरंगा ध्वज रॅलीत इयत्ता पहिली ते सातवीं च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोदवला होता
व विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगी ध्वज, घोषवाक्यांचे फलक यामुळे ध्वज रॅलीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गणेश कोकुलवार व शिक्षिका अनुरा़ध गट्टे, फरिहा इ, बंडू घाळपा, जळबा सरोदे, अविनाश हंडरगुळे, चक्रधर देशमुख, राम कोटगिरे, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी मंडलवाड यांनी खुप प्रयत्न करून मोलाची साथ दिली. शा़ळेचे सेवक, संभाजी सूर्यवंशी ,तसेच संरपच काशीबाई ठाकुर, उपसरपंच अतुल वानखेड़े, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते, या कार्यक्रमाला गावातील युवक मंडळी व पत्रकार ,ज्येष्ठ मंडळीची उपस्थित होती,
