
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी,
तालुक्यातील मौजे सवना (ज) ग्रामपंचायती मधील स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेत झालेल्या गैर व्यवहारात सामील असलेल्या ग्रामसेवक, सरपंच/ उपसरपंच व रोजगार सेवक त्यांच्यावर कार्यवाही करण्यास पंचायत समिती प्रशासन टाळाटाळ करत असल्याने ग्रामसेवका सह संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी मौजे सवना येथील शिवसैनिक बालाजी आलेवाड यांनी आज दिनांक 9 जून रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिस व शिवसैनिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करत्यास ताब्यात घेऊन आत्मदहन करण्यापासून रोखले आहे
तालुक्यातील मौजे सवना ज येथील स्वच्छ भारत योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात मागील कित्येक दिवसापासून सतत पाठपुरावा करत असलेले शिवसैनिक यांनी आज टोकाची भूमिका घेऊन दिनांक 9 जून रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर मौजे सवना येथील आरोप सिद्ध होऊन सुधा भ्रष्टाचाऱ्या विरोधात कारवाई का करत नाही ? अससे म्हणत येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी स्थानिक पोलिस प्रशासन व शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, किसान सेना तालुकाप्रमुख प्रकाश जाधव, तालुका संघटक संजय काईतवाड ,यांच्या आदी शिवसैनिकांच्या तत्परतेने आंदोलनकर्त्यांना रोखले व येत्या आठ दिवसात दोषी ची योग्य चौकशी करून वरिष्ठांना कळवून दोषीवर कारवाई केली जाईल असे लेखी पत्र घेऊन हे आत्मदहन मागे घेतले त्यामुळे या भ्रष्टाचारामध्ये दोषी असणाऱ्या विरोधात पंचायत समिती कार्यालयाने अजून आठ दिवस टागती तलवार ठेवली आहे ?असे आज सिद्ध झाले आहे
