चक्क लग्नाचे कारण दाखऊन शाळेच्या गेटला कुलूप ठोकून शिक्षक पसार,विद्यार्थी मात्र वाऱ्यावर ! युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड यांनी केली गटशिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार

हिमायतनगर शहरातील राजा भगीरथ शाळेतील शिक्षकांचा मनमानी पणा उघडकीस !

हिमायतनगर शहरातील सर्वात परिचित असलेली राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाच्या मुलाचे लग्न असल्याने कारण देत शाळेत आलेल्या विद्यार्थांना सुट्टी देऊन घरी पाठवल्याचा प्रकार आज दि 4 ऑगस्ट रोजी 10 वाजता उघडकीस आला त्यामुळे युवा सैनिकांनी संताप व्यक्त करत या शाळेतील शिक्षकांनी सर्व शासकीय नियम पायदळी मोडीत काढल्यामुळे या शाळेतील सर्व शिक्षांचे एका दिवसाचे मानधन देण्यात येऊ नये व दोषिवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील गटशिक्षण अधिकारी शिंदे यांच्या कडे युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड यांनी केली आहे

  

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरात राजा भगीरथ उच्च माध्यमिक शाळा आहे ही एक मोठी शाळा म्हणून नावा रुपाला आलेले शाळा म्हणून ओळखल्या जाते या शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग मोठ्या प्रमाणात भरतात त्यामुळे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून असंख्य गोर गरीब विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात पण येथील मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी शाळेतील एका शिक्षकाच्या मुलाचे लग्न असल्याचे कारण दाखवून चक्क पाचवी ते दहावी व अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी सुट्टी देऊन शाळेच्या गेटला कुलूप लावून सर्वच शिक्षक पसार झाल्याची घटना दि 4 ऑगस्ट रोजी घातली व शाळेत आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना घरी परत पाठवले त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना व विद्यार्थ्यांना सुद्धा चक्क एका शिक्षकाच्या मुलाचे लग्न असल्याकारणाने घरी परतावे लागल्यामुळे संत्रप्त झालेल्या काही पालकांनी शाळेच्या शिक्षकांना याची विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की सकाळी दोन तास शाळा सुरू होती नंतर आम्हाला लग्नाला जायचे असल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुट्टी दिली ! असे कारण सांगितले त्यानंतर काही पालकांनी संबंधित शिक्षकांना विचारले की शिक्षकांच्या मुलाचे लग्न आहे हे कारण दाखऊन तुम्ही शाळेला सुट्टी देऊ शकता का ? अशी विचारणा केली असता आम्हाला माहित नाही असे उडवा उडवी चे उत्तर त्यांनी दिले त्यामुळे युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड यांनी संबंधित मुख्याध्यापकां विरोधात संताप व्यक्त करून या घटनेची जिओ टॅग द्वारे काढलेल्या फोटोची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी व असे गैर कृत्य करणाऱ्या शाळेतील सर्व शिक्षकांचे एका दिवसाचे मानधन पगार देण्यात येऊ नये अशी मागणी हिमायतनगर येथील नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे केली आहे व त्याची प्रतीलिपी वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब नांदेड, शिक्षणाधिकारी कार्यालय नांदेड, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी व हिमायतनगर येथील तहसीलदार यांना दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, अमोल धुमाळे सह आदी जण उपस्थित होते

नांदेड शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळेवर कारवाई करा :- लक्ष्मण टेकाळे

शाळेतील एका शिक्षकाच्या मुलाचे लग्न असल्याने कारण देत शाळेत आलेल्या विद्यार्थांना सुट्टी देऊन घरी पाठवले, ग्रामीण भागात मधून आलेल्या विद्यार्थ्यांचे येण्या-जाण्याचा खर्च पण वाया गेला आमच्या गोरगरीब शेतकरी मायबाप आपल्या मुलाला शाळेत येण्यासाठी रोज मजुरी करून पैसे देतात आणि हे शिक्षक लोक अचानक अशी शाळा बंद ठेवतात सर्व शासकीय नियम मोडीत काढल्या मुळे या शाळेतील सर्व शिक्षांचे एका दिवसाचे मानधन देण्यात येऊ नये ह्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब व शिक्षणाधिकारी साहेब यांनी ह्याची दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मनसे विद्यार्थी सेनेचे लक्ष्मण टेकाळे यांनी सुद्धा सोशल मीडिया वर केली आहे

विद्यार्थ्यांना पूर्व सूचना दिली होती :-
मुख्याध्यापक