एक ट्रॅक्टर जप्त केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

हिमायतनगर …प्रतिनिधी
मागील कित्येक दिवसा पासून रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने तालुक्यातील रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. ते रात्री बे रात्री नाल्यातील व नदीतील रेतीची अवैध वाहतूक करत असल्याची बातमी महसूल विभागाला कळताच हिमायतनगर सज्जा चे कर्तव्य दक्ष तलाठी पुणेकर यांनी काल दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी हिमायतनगर शहरातील बोरगडी रोडवर एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून ते हिमायतनगर पोलिस स्थानकात लावण्यात आले त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुध्दा ठप्प पडली होती. मात्र अताच कुठे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिली त्यामुळे शहरातील अनेक जण प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेले घरकुल बांधकाम करत आहेत .पण सद्या तालुक्यातील कुठल्याच रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे शासकीय, निमशासकीय आणि शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बांधकामे ठप्प पडली आहे. याचाच सर्वाधिक गैर फायदा तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणारे घेत होते व शहरातील घरकुल बांधकाम करणाऱ्या नागरिकांना बे भाव दराने रेती विकत होते त्यामुळे रात्री बे रात्री रेती ची अवैध वाहतूक करणारे रेती माफिया यांना आवर घालण्यासाठी हिमायतनगर तहसीलचे तहसीलदार गायकवाड साहेब ,व मंडळ अधिकारी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर सज्जाचे तलाठी दत्तात्रय पुणेकर साहेब यांनी काल दिनांक 27 जानेवारी रोज बुधवारी अंदाजे दुपारी दोनच्या सुमारास बोरगडी रोड कडे रेतीने भरून जात असलेला अवैध रेतीचा ट्रॅक्टर पकडून तो हिमायतनगर येथील पोलिस स्थानकात लावण्याने तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे
