हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 11 मधून लोकप्रिय व्यापारी गोविंद बंडेवार यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्या : जनतेची मागणी


👉🏻आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून बंडेवार यांची तालुक्यात ओळख

हिमायतनगर प्रतिनिधी


नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 चे आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या वार्ड क्र 11 ची कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी शहरातील व वार्डातील रहिवाशी प्रसिद्ध व्यापारी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू निष्ठावंत कार्यकर्ते गोविंद तुकाराम बंडेवार यांनाच ही उमेदवारी देण्यात यावी यासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांची मागणी आहे

हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचे आरक्षण सोडत झाल्यानंतर शहरात जागो जागी हॉटेल मंदिर परिसरात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने शहरातील सर्व वार्डातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर व शहर अध्यक्ष संजय माने यांनी काँग्रेस संपर्क कार्यालयात सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते त्यामध्ये वार्ड क्रमांक 11 मधून आमदार माधवराव पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते गोविंद तुकाराम बंडेवार यांनी हा अर्ज भरला त्यामुळे वार्ड क्रमांक 11 मधून पक्षाचे काम करणारे व वेळोवेळी जनतेच्या अडीअडचणी सोडणारे समाजामध्ये अग्रेसर असणारे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते यांना ही उमेदवारी मिळेल का ? ह्या कडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागले आहे
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांच्याशी संपर्क केला असता यांनी असे सांगितले की नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर साहेब व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माधवराव पाटील जळगावकर साहेब हे सर्व अर्जाची छाननी करून वेळ प्रसंगी योग्य उमेदवारास उमेदवारी देतील आता कुणाचेही नाव स्पष्ट करण्यात आले नाही आता फक्त काँग्रेस पक्षातील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचेच अर्ज मागून घेण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले