
परमेश्वर सुर्यवंशी :प्रतिनिधी
खड्ड्याच्या मार्गाने बस वहातुक करावी लागते.
हिमायतनगर पळसपुर डोलारी गांजेगाव ढाणकी मार्गाची दयनीय अवस्था
.२९.हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर पळसपुर डोलारी गांजेगाव ढाणकी मार्गाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे
हा रस्ता तत्कालीन माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील यांच्या प्रयत्नामुळे२००७-८साली झाला आहे पंरतु आतापर्यंत या रस्त्याची सुधारणा झाली नसल्याने रस्ता खड्डेमय झाला
याच खड्याच्या रस्त्यावर ऊमरखेड आगाराने प्रवाशी उत्पन्न मिळत असल्याने बस वहातुक चालु केली
वरिल रस्त्याची मागणी या भागातील नागरिकांनी लावुन धरली असता
अखेर हिंगोली लोकसभेचे खा.हेमंत पाटील यांचा प्रयत्नामुळे हिमायतनगर पळसपुर डोल्हारी पर्यंत प्रधान मंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता मंजुर करण्यात आला सर्वेक्षण झाले ईस्टीमेट सुद्धा होऊन औरंगाबाद येथील कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला परंतु काय झाले कुठे रस्त्याचे घोडे अडले हे कळणे अवघड झाले आता फक्त काम केंव्हा सुरू होणार याकडे भागातील नागरिकांना आहे अशा खराब रस्त्यावर ऊमरखेड आगाराने प्रवाशी उत्पन्न मिळत असल्याने बस वहातुक चालु केली आहे त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
तसेच हिमायतनगर बोरी ब्रामणगाव हरदडा ,विडुळ, ऊमखेड रस्ता सुव्यवस्थीत असुन प्रवाशी ऊत्पन्न मिळत नसल्याने बस सुरू नाही
हिमायतनगर, बोरी, ब्रामणगाव ,हरदडा मार्ग ढाणकीला राष्ट्रीय महामार्ग गेला असुन कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा प्रवासी मिळत नसल्याने उमरखेड आगारप्रमुख बस चालु करीत नाहीत.अशी अवस्था असल्याचे प्रवाशांतुन बोलले जात आहे.
रस्ता आहे तिथे बस नाही, रस्ता नाही तेथे बस सुरू आहे . अशा खड्ड्याच्या मार्गाने बस वहातुक हिमायतनगर पळसपुर ,गांजेगाव ,ढाणकी मार्गावर बसेस पाच वेळा बस सुरू आहेत
अनेक वर्षापासून मागणी असुन सुद्धा ह्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही हिमायतनगर पळसपुर गांजेगाव ढाणकी मार्ग अत्यंत कमी अंतराचा असल्याने रस्ता होणे गरजेचे आहे परंतु लोक प्रतिनिधींच्या दुर्लक्ष पणा मुळे हा रस्ता ह्या मार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२आय अर्धापूर तामसा जवळगाव विरसणी हिमायतनगर पळसपुर गांजेगाव ढाणकी मार्ग प्रस्तावित होता परंतु काही मतलबी लोकांनी या मार्गातबदल करून तो हिमायतनगर नगरला न येता घारापुर फाट्या पासून वळवून बोरी ब्राम्हणगाव हरदडा ढाणकीला आठ किलो मीटर जास्त अंतराने गेला. रस्ता सुव्यवस्थित आहे परंतु या रस्त्यावरून बस वहातुक चालु नाही मात्र हिमायतनगर पळसपुर गांजेगाव ढाणकी रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था असली तरी ऊमरखेड आगारास ऊत्पन्न मिळत असल्याने बस वाहतुक चालु आहे
तरी आतापर्यंत चे हदगाव हिमायतनगर ,उमरखेड तालुक्यातील आमदार व लोक सभेचे खा.यांनी लक्ष दुर्लक्ष केल्याने रस्ता झाला नाही आता सध्या असलेले लोकप्रिय हदगाव हिमायतनगर विधानसभेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी लक्ष देऊन हिमायतनगर, पळसपुर, गांजेगाव, ढाणकी मार्गाची सुधारणा करण्याची गरज आहे
रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असी मागणी जनतेतून जोर धरु लागली आहे.
