
हिमायतनगर / प्रतिनिधी ( परमेश्वर सुर्यवंशी )
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हा आढावा बैठकीत दिनांक 17-10-2021 रोजी दुपारी १. वाजता हिमायतनगर तालुक्यातील तानाजी गाडेकर यांची पदोन्नती करून सोशल मीडिया जिल्हा प्रमुख पदी तानाजी गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. आणि हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगावचे लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघटनेचे माजी उत्तर जिल्हा अध्यक्ष संतोष हातवेगळे यांची लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, सदरील निवडी जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कमीटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या वेळी मराठवाडा अध्यक्ष नागोराव आंबटवाड व जिल्हा अध्यक्ष प्रदीपभाऊ वाघमारे,कोर कमीटी जिल्हा अध्यक्ष संतोष सुर्यवंशी प्रितम गवाले, रविकांत पवळे,के,डी,पवार. हदगाव तालुका अध्यक्ष संतोष वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, हिमायतनगर कोर कमीटी अध्यक्ष गंगाधर गणपत गायकवाड , युवक तालुकाध्यक्ष विकास गाडेकर , सामाजिक कार्यकर्ते संतोष बनसोडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत महाजन, निरंजन कांबळे, विनोद भालेराव, मारोती जलधरे, मारोती गाडेकर,सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
