कोरोना विषाणू विषयी जागरूकता बाळगावी. पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांचे नागरिकांना आव्हान

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी

कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत आपण या भयावह परिस्थिती मध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून जागृतता बाळगावी असे नम्र आवाहन
हिमायतनगर पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी हिमायतनगर शहरातील व तालुक्याच्या हादीतील नागरिकांना केले आहे आहे. कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी डॉ.ईटनकर साहेब नांदेड यांनी दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांनी तंतोतंत पालन करून होळी , धुलीवंदन व शिवजयंती ( तिथीप्रमाणे ) तसेच आगामी काळातील सण व उत्सव हे घरगुती पद्धतीने साजरे करून प्रशासनास व पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे जेणेकरून आपल्याला कोरोना आजारावर मात करता येईल. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव साजरे करून महाराष्ट्र शासनाचे व जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल . आपण व आपला गाव कोरोणा विषाणु पासून मुक्त होण्यासाठी नियमाचे तंतोतंत पालन करावे असेही नम्र आवाहन हिमायतनगर पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी जनतेला केले आहे.