हिमायतनगर नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एकजुटीने कार्य करा:- जिल्हाप्रमुख कोकाटे गप्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात निष्ठावंतांना न्याय मिळणार का !

परमेश्वर सुर्यवंशी… प्रतिनिधी


हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुकीचे आरक्षण दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर हिमायत नगर शहरात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे त्यामुळे नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ कोकाटे यांनी दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी हिमायतनगर शहरातील बालाजी हायस्कूल येथे आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका व शिवसेना पक्ष प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान या पार्श्वभुमीवर पक्षश्रेष्ठींकडुन आलेल्या आदेशा प्रमाणे, मा.खा. हेमंतभाऊ पाटिल व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सुचने वरून एक आढावा बैठक घेतली त्या बैठकीत बोलताना जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे यांनी असे सांगितले की आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना सर्व ताकदीनिशी नगरपंचायत भगवा झेंडा फडकवण्यासाठी तयारी करणार आहे व शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करून शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्यासाठी काम करावे त्यामुळे नगरपंचायत वर आपला झेंडा नक्कीच फडकेल असे त्यांनी यावेळी सांगितले
या प्रसंगी या बैठकीस महिला जिल्हा उप शहर संघटीका शितल पाटिल, यांची प्रमुख उपस्थितीती होती
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, किसान सेनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल राठोड, उपतालुकाप्रमुख विलासराव वानखेडे, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, उपशहर प्रमुख राम नरवाडे, जेष्ठ शिवसैनिक शंकर चेलमेलवार, जफर लाला, शुभम दंडेवाड, सावन डाके, अल्पसंख्यांक युवा तालुकाध्यक्ष इद्रिस शेवालकर, सावन रावते सचिन जाधव पाटील, हनुमान आरे पिल्लू, शंकर जाधव पाटील, संतोष साभळकर, संदिप चवरे, ता. संघटक संजय काईतवाड, महिला अाघाडिच्या मंगलाताई कोरडे, पत्रकार अनिल भोरे, मारोती ढवळे, नागेश शिंदे, साई अण्णा तोटेवाड, कृष्णा शिंदे, शुभम नरवाडे, विपुल दंडेवाड, संदेश नरवाडे, शिवकुमार वारकड, अमोल नरवाडे विवेक कदम, यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची या बैठकिस उपस्थिती होती
(चौकट…)
निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्या :- विलास वानखेडे
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यासमोर बोलताना हिमायतनगर उपतालुका प्रमुख विलास वानखेडे यांनी असे सांगितले की हिमायतनगर शहरात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मागील 25 वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये संधी मिळावी व त्यांना कुठे ना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी पक्षश्रेष्ठींनी लक्ष द्यावे व जुन्या जाणकार कडवट शिवसैनिकांना या नगर पंचायत निवडणुकीत संधी देऊन न्याय द्यावा अशा भावना व्यक्त केल्या