
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
हिमायतनगर| मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील दोन्ही पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अध्यक्ष महोदयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हिमायतनगर मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री परमेश्वर मंदिरात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, जेष्ठ पत्रकार असद मौलाना, दत्ता शिराने, अनिल मादसवार, कानबा पोपलवार, संजय मुनेश्वर, ज्ञानेश्वर पंदलवाड, शुद्धोधन हनवते, अनिल भोरे, सोपान बोम्पिलवार, वसंत राठोड, संजय कवडे, मनोज पाटील, परमेश्वर शिंदे, धम्मपाल मुनेश्वर, सदाशिव पतंगे, नागोराव शिंदे, सुनील चव्हाण, परमेश्वर सूर्यवंशी, विष्णू जाधव, अनिल नाईक, शेख अल्ताफ सोनारीकर यासह येथील नागरिक शेख मुजीब खडकीकर, देवराव वाडेकर, लक्ष्मण पाटील, प्रकाश हंपोलकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
