
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथिल राम मंदिर निर्मितीसाठी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली त्यावेळी अनेक सर्व समाजातील बांधव सहभागी झाले त्याच बरोबर लहान चिमुकल्या मिलीने डोक्यावर कळस घेऊन पुर्ण गावाने रामाच्या जय श्रीराम घोषणा देत निधी समर्पण अभियानास सुरुवात केली काही मुस्लिम बांधव व माताने राम मंदिर उभारणीच्या निधी मध्ये आपला सहभाग नोंदविला खरच आपला देश हा सर्व धर्म समभाव आहे असे करंजी झालेल्या शोभायात्रा मध्ये दिसुन आले ही एकता अशीच टिकुन राहिले पाहिजे सर्वानी श्रीराम मंदिर उभारणीला सहकार्य करावे असे अनेक मुस्लिम समाजातील बांधव यांनी म्हटले आहे आज करंजी शोभायात्रा मध्ये माता भगिनी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाचे पो पाटील तसेच नव युवक यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आज करंजी एका दिवसात जवळपास ४१५१रूपये निधी जमा झाला आहे तो आम्ही राम मंदिर समितीकडे सोपवण्यात आला आहे .
श्रीराम हे धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर ही भारतीय मनाची शाश्वत प्रेरणा आहे ! यासाठी श्रीराम भक्तांनी 492 वर्षे अविरत संघर्ष केला आहे. भूतकाळात झालेल्या 76 संघर्षात 4 लाखाहून अधिक रामभक्तांनी बलिदान दिले आहे. जवळजवळ 36 वर्षांच्या सुसूत्र आणि शृंखलाबद्ध अभियानामुळे संपूर्ण समाजाने लिंग, जाती, वर्ण, भाषा, पंथ, प्रदेश या सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन एकात्मभावाने श्रीरामाच्या मंदिरासाठी असीम त्याग आणि बलिदान दिले आहे. परिणामस्वरूप 9 नोव्हेंबर 1989 ला श्रीराम जन्मभूमिवर शिलान्यास झाला.
