
हिमायतनगर प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक रामराव पाटील सुर्यवंशी यांची नात श्रीमयी श्रीनिवास सुर्यवंशी हीची सुपर डान्सर फिनाले 4 च्या Sony Tv च्या कार्यक्रमा मध्ये निवड झाली आहे तिचा चित्रित झालेला भाग आज दि.27 मार्च रोज शनिवारी रात्री 8 वाजता सोनी टी व्ही चॅनेल वर दिसणार असल्याने सर्व हिमायतनगर तालुक्यातून तिच्यावर शुभेच्छानचा वर्षाव होताना दिसून येत आहे व सर्व शोशल मीडिया वर तीच्याच व्हिडिओ ची चर्चा रंगत असल्याचे पहायला मिळत आहे
दर वर्षी सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो सुपर डान्सर मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक दमदार परफॉर्मन्स सादर करतात पण एका छोट्याश्या ग्रामीण भागातील मुलगी ते पण अभिनेत्री शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू यांच्या कार्यक्रमात त्यांच्या समोर इतकी सुंदर भूमिका बजावत आहे हे पाहूनच हिमायतनगर तालुक्यातील नागरिक आनंदी होत आहेत दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावतात अशा स्टेज वर हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक रामराव पाटील सुर्यवंशी यांची नात श्रीमयी श्रीनिवास सुर्यवंशी हीच्या डान्सचा शो पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता लागली आहे
