रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा लोक नेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांची आयुक्तांकडे मागणी


प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी


नांदेड शहरातील कोविड- १९ दवाखाण्यांनी अधिकच्या बेडची मान्यता घेवुन रेमडेसिव्हर इंजक्शनचा काळाबाजार चालवला आहे, या प्रकारास जबाबदार असणारे अन्न वऔषध प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त, व निरीक्षकांची वरिष्ठां कडुन चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना दिलेल्या निवेदना द्वारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त मुंबई, विभागीय आयुक्त औरंगाबाद  यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात कोहळीकर यांनी लिहीले आहे की, नांदेड जिल्ह्यात कोरोना काळात अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिव्हर इंजक्शनचा तुटवडा दाखवुन अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी काही विक्रेत्यांना हाताशी धरून औषधाची विक्री चढ्या भावाने विक्री करीत आहेत त्यामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णांचे या बाबीमुळे मृत्यु होत आहेत.
जिल्ह्यात शासकीय वगळता 50 ते 60 खाजगी रुग्णालयांनी सोयीच्या कोविड केअर सेंटरच्या नावाखाली दुकाने थाटली आहेत त्यात त्यांचेकडे आवश्यक साधन सामग्री सुविधा जसे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर नाहीत, ऑक्सीजन साठा नाही, असे असतांनाही येथे तज्ञ डॉक्टर नाही, मात्र बेड संख्या, रूग्ण संख्या  जास्त दाखवून येथील मेडीकलवर रेमडेसिव्हर इंजेक्शन अतिरिक्त पुरवले जात आहे व त्यानंतर तेथून आपल्या खाजगी व्यक्तीमार्फत हेच इंजेक्शन गरजूंना 25 हजार पेक्षा जास्त दर आकारून काळ्या बाजारात विकले जात आहेत अशी आजची वास्तव परिस्थिती यात नमुद केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांनी निवेदनात लिहीलय एफडिए अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार होत आहे, दवाखाण्याच्या नावाचा उल्लेख करतांना नांदेड मधील आशा कोविड सेंटर, अश्विनी हॉस्पिटल नामांकित रुग्णालयावर निशाना साधत कमी बेड असतांनाही जास्तीचे बेड दर्शविले आहेत व त्यात आकाराने रुग्ण संख्या जास्त दाखवुन जास्तीचे इंजेक्शन दिलेले आहेत. असा आरोप त्यांनी केला आहे.
प्रत्यक्षात एच आर सिटी स्कोअर, ऑक्सिजन लेवल आदी बाबी रुग्णांचे वय , इतर आजार व गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णास इंजेक्शन देणे क्रमप्राप्त असतांना कोणतेच निकष पाळले जात नाहीत व तशा गरजूंना हे इंजेक्शन मिळत नसल्याने दररोज नांदेडचा मृत्यु दर वाढत आहे. याला जबाबदार काळाबाजार करणारे मेडिकल व्यवसायिक मोठे हॉस्पिटल व अन्न व औषध प्रशासन विभाग जबाबदार आहे.
रेमडेसिव्हर इंजेक्शन पुरवठा प्रकरणी वरिष्ठ अधिकारी पाठवून तात्काळ चौकशी करावी, व सध्याचे कार्यरत सहआयुक्त व निरीक्षक यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना दिलेल्या निवेदनातुन अन्न व औशध प्रशासनाच्या आयुक्त, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचे कडे केली आहे.