रमजान महिन्यात वीज पुरवठा सुरळीत करा:- शेख रफीक सेठ 👉🏻शहरात विविध भागात रात्री बे रात्री विजेचा लपंडाव सुरू 👉🏻 महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

हिमायतनगर प्रतिनिधी


शहरात रमजान महिन्यात सुद्धा विविध भागात विजेचा लपंडाव सुरूच आहे महावितरणच्या निष्काळजीपणाने हिमायतनगर शहरातील मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यात याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसापासून शहर आणि परिसरात सतत वादळी वारे व पावसामुळे अनेक भागात खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा दावा महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आला होता . पण सरसम येथील महावितरण कंपनीत थोडी बिगाड झाली तर त्याचा फटका हिमायतनगर शहरातील नागरिकांना का ? शहरात दिवसा व रात्रीला वीज सतत ये-जा करीत असल्याने येथील नागरिकांना रमजान महिन्यात सुद्धा ह्याचा खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिन्यातील वीज पुरवठा सुरळीत करा अशा सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफिक सेठ यांनी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
तालुक्यात बहुतांश भागात मागील दोन दिवसा पासून विजेचा लपंडाव दिवस रात्र सुरू आहे.मुस्लिम समाजाचा पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात शहरात वारंवार वीजपुरवठा अचानक खंडित होण्याच्या प्रकारांमुळे पंखे व कूलर बंद पडल्याने असंख्य नागरिक उकाड्याने हैराण होत चालले आहेत महावितरण उपकेंद्रातील काही ठिकाणी तांत्रिक बिघाडाने अनेक ठिकाणी वीजपुरवठ्यात अडचणी येत असल्याचे ‘महावितरण’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे
संचालक रफीक शेठ यांनी महावितरण कार्यालयास दिले असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

-: चौकट :-

चक्क मोबाईल चार्जिंग करण्यासाठी सवनेकरांना करावा लागतोय जनरेटर चा वापर…..!!!

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथे दि.०७ मे च्या सकाळपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विजेच्या अभावी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या महावितरण च्या मनमानी कारभाराला वैतागून येथील गावकऱ्यांनी चक्क मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दत्ता बुद्धेवाड यांच्या जनरेटर चा वापर करात आपले मोबाईल चार्ज केले ही परिस्थिती पाहून तरी महावितरण ला जाग येईल का ? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत