
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील एक चळवळीचे गाव येथील कार्यकर्ते सदैव अग्रेसर असणारे मौजे वाघी येथील सरपंच पदि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे खंदे समर्थक तथा कट्टर शिवसैनिक श्रीराम माने पाटील व संतोष माने यांच्या पॅनलचे नामदेव रामराव खांडरे यांची सरपंच पदी तर उपसरपंचपदि सौ. सुमनबाई संजय माने यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीला सूचक व अनुमोदन म्हणून ग्रामपंचायत सदस्य ललिता गंगाधर हांमद यांनी दिले
यावेळी निवडणुक निर्वाचन अधिकारी दमकोंवार साहेब तलाठी मेतलवाड साहेब, ग्रामसेवक फुलके साहेब यांनी काम केले.पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी महाजन, पोलिस उपनिरीक्षक परशुराम देवकते, पोलिस बीटजमादार कांगणे मॅडम यांची उपस्थीतीती होती. सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी झाल्यानंतर वांघी गावचे पॅनल प्रमुख श्रीराम माने पाटील यांनी असे सांगितले की या सर्व यशामागे आता नुकतेच निधन झालेले माजी उपसरपंच स्व. नागोराव देवसरकर यांचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या जाण्याने आज आमच्या मध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली ती पोकळी कदापिही भरून निघणार नाही असे त्यांनी यावेळी भावनिक उदगार काढले
या निवडीबद्दल हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड ,शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार ,विलास वानखेडे, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे ,पत्रकार अनील भोरे, नागेश शिंदे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य ललिता गंगाधर हांमद हे होते अनेकांनी नवनियुक्त सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन केले
