
हिमायतनगर प्रतिनिधी:(परमेश्वर सुर्यवंशी)
हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथिल पाणी पुरवठा योजना अंतर्गत झालेल्या पाणी सप्लायर्सचे काम अर्धवट झालेले असुन ते पुर्ण करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आंदेगाव ग्रामपंचायत तालुक्यातील विकसीत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते मात्र या ठिकाणी ग्रामसेवक व पाणी पुरवठा ठेकेदाराकडून पाणी पुरवठा योजनेचा बट्याबोळ झालेला दिसुन येते त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत लागलीच काही दिवसांवर हिवाळ्यात देखील पाण्यासाठी रात्री बे रात्री गावाच्या बाहेर जावे लागते याकडे मात्र कोन्ही लक्ष देण्यास तयार नाही नाही या ठेकेदाराची चौकशी केली जात नाही याचं कारण ग्रामसेवक पाणी पुरवठा अध्यक्ष व ठेकेदार यांची काही घोटाळे बाजी आहे असे येथिल नागरीक म्हणत आहेत या आधी सुध्दा पाणी पुरवठा संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते पण त्या निवेदनाचा कोणी विचार करत नसल्याने नागरीक वैतागून गेले जर का दिलेल्या निवेदनाची दखल घेतली जात नाही हा लोकशाहीचा घात आहे अधिकारी कुठे तरी राजकीय दबावाला बळी पडत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर यमलवार यांनी केले आहे जर का शासनाने पाणी पुरवठा योजना राबविण्यात यासाठी लाखो रुपये खर्च करून नागरीकांना पाणी मिळत नसेल तर योजना राबविल्या जाण्याचा अर्थ काय असा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो म्हणून आंदेगाव पाणी अंतर्गत योजेची चौकशी करून राहीलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
