
रूग्णांना गाडी देण्यास नाकारले याला जबाबदार कोण?
परमेश्वर सुर्यवंशी….. प्रतिनिधी
काल रात्री उशिरा 11 ते बारा वाजेच्या सुमारास फुलेनगर येथिल एका महिलेला ग्रामीण रुग्णालयात प्रसूती साठी दाखल केले असतां रुग्णालयात कडून नांदेड ला न्या म्हणून रेफर लेटर देण्यात आलं सदर महिलेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेसाठी मागणी केली असता सदर रुग्णवाहिका उपलब्ध असून सुद्धा देण्यात आली नाही त्यानंतर 102 ला संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली त्यांनी दूरध्वनीवरून असे सांगितले की सरसम ची आणि चिचोरडी येथील गाडी उपलब्ध आहे पण ड्रायव्हर फोन उचलत नसल्याने आम्ही गाडी पाठवू शकत नाही असे सांगितले आता प्रश्न असा की गरोदर माता आणि बाळाच्या सुरक्षेसाठी शासन विविध योजनेतून लाखो रुपये खर्च करते आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधीनि वारंवार आरोग्य व्यवस्थेतील अधिकारी कर्मचारी यांना रुग्णांची हेडसांड करूनका असे निर्देश दिले असून तरीही आरोग्यव्यवस्थेतील अधिकारी कर्मचारी यांच्या नाकर्तेपणा मूळे गोर गरिबांचे जीव धोक्यात येत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे सद्या महाराष्ट्रात कोरोणा महामारीचे रुग्न दिवसेंदिवस वाढत आहे त्यात आरोग्य कर्मचारी याचा अभाव आरोग्य केंद्रामध्ये ना डॉ वेळोवेळी राहत नाही असे तक्रारी केल्या गेल्या पण याकडे कोणाचे ही लक्ष जात नाही लाखो रुपये खर्च करून मोठं मोठें दवाखाने उभे केले पण त्या मध्ये कोणत्या पद्धतीने कर्मचारी भरले गेले नाही नांवाला इमारती उभ्या केल्या त्याच उपयोग मात्र शून्य आहे नाही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही प्रशासनाचे जनता कोणाच्या भरोसावर दवाखान्यात जाईल यांचे उत्तर कोण देणार आसा सवाल एका नागरिकाने पत्रकारांशी केला आहे जर का दोन दिवसांत आरोग्य केंद्रामध्ये असुविधा आढळून अल्यास त्याचा परिणाम शासनाला सोसावा लागेल.
