
परमेश्वर सुर्यवंशी :प्रतिनिधी हिमायतनगर
काल दिनांक २९ रोजी महाविद्यालयाने काढलेल्या पत्रात हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे सेंटर हे भोकर येथील हलविण्यात आले होते या संबंधित विद्यापीठातील कुलगुरू साहेबांना दिनांक 30 रोजी एन एस यु आय च्या निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते की हिमायतनगर तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थी असून ते त्यांच्या परिस्थितीनुसार हिमायतनगर शहरात शिक्षण घेत असतात आणि सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी लांबचा प्रवास करून हिमायतनगर शहरात येतात या सर्व गोष्टीची दखल घेऊन आज एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष शंकर शिंदे पाटील व व एन एस यू आय तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत होळकर यांनी दिलेल्या निवेदनामुळे विद्यार्थ्यांचे भोकर येथील सेंटर हटवून हिमायतनगर येथील महाविद्यालयात देण्यात आले आहे.
या कामात वेळोवेळी एन एस वाय चे जिल्हा अध्यक्ष शंकर शिंदे पाटील, हिमायतनगर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर व हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले असे एन एस यू आय हिमायतनगर चे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत होळकर त्यांनी सांगितले
