

प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
तालुक्यातील मौजे करंजी येथे सोशल डिस्टन्स चे पालन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, परमपूज्य, बोधिसत्व, युगपुरुष, विश्वरत्न, सत्यशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार,संविधानाचे जनक,तत्वज्ञानी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती 14 एप्रिल रोजी ग्रा.प कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरपंच बालाजी पुट्ठेवाड यांनी अभिवादन केले.
यावेळी सरपंच बालाजी पुट्ठेवाड. कु.उ. बा संचालक नासर पठाण,
उपसरपंच पांडुरंग सूर्यवंशी,पोलीस पाटील बापूराव मिराशे, शेख फकीर, सदस्य निरंजन जाधव, सदस्य अरुण गाडेकर,सदस्य शबीर पठाण,सदस्य रामकिशन सुंकरवार, केशव सूर्यवंशी, श्रीनिवास सूर्यवंशी, विकास गाडेकर, तानाजी गाडेकर, माधव गाडेकर,श्रीकृष्णा माने, सुनील गाडेकर, सेवक वसंता गाडेकर
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली यांवेळी मुख्याध्यापक राठोड सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदर्शन जाधव, सेवक नानाराव कदम आदी.
