
शहरात विना परवाना वाहने चालू नये :- पोलीस निरीक्षक भुसनुर साहेब
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरात विना परवाना दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील कॉलेजच्या मुलांनी विना परवाना वाहने शहरात चालू नये,शहरातील पालकांनी आपल्या लहान मुलांना वाहन देऊ नये व सर्व वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करत वाहने चालवावी असे आव्हान हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक बि.डी. भुसनुर साहेब यांनी केले आहे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल
शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने दररोज अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे अनेक कॉलेज तरुणाई आपल्या दुचाकीवरुन ट्रीपलसीट वाहनावर सुसाट वेगाने धावताना नजरेस पडले आहेत त्यामुळे हिमायतनगर पोलिसाकडून त्यांच्यावर कारवाई सुरू केले आहे दि 22 जुलै रोजी हिमायतनगर पोलिसांनी शहरातील मुख्य कमानी जवळ पेहरा देऊन 13 वाहणावर कार्यवाही करून 8500 रुपयाचा दंड वसूल केला आहे ही कारवाईची मोहीम अशीच सुरु ठेवली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनुर साहेब यांनी सांगितले त्यामुळे शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन न करणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट प्रवास करणे या कारणांमुळे अनेक अपघात होत आहेत. याला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शेवाळे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे साहेब, उप. वि.पो. अ.श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलिसानं कडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्यासाठी शहरातील कॉलेजच्या मुलांनी विना परवाना वाहने चालू नये,दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ फिरू नये,शहरातील पालकांनी आपल्या लहान मुलांना वाहन देऊ नये व सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आव्हान हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक बि.डी. भुसनुर साहेब यांनी केले आहे यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन,नंदलाल चौधरी, बिट जमादार अशोक सिंगनवार,पोलीस कर्मचारी मेडके साहेब, कुलकर्णी साहेब नितीन राठोड, पोहेका साखरे, आउलवार साहेब सह आदी जन या मोहिमेत सहभागी होते…
