
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर| तालुक्यातून बोलेरो पिकअप या वाहनातून मागील फालक्यात दोन ते अडीच इंच उंची वाढऊन गाई या जनावराची शिंग, मस्तक, पायाचे, कुरे, त्याचबरोबर वेगवेगळया जनावराचे हाडे वाहनातुन तस्करी करून नेताना विश्वहिंदु परिषद किनवट जिल्हामंत्री किरण बिच्चेवार यांच्या माहितीवरून नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ हिमायतनगर पोलिसांनी वाहनसह आरोपीना जेरबंद केले आहे. या घटनेमुळे हिमायतनगर शहरात गोहत्या होत असल्याचे दिसून येत आहे.
हिमायतनगर शहर हे तेलंगणा – विदर्भाच्या सीमेवर वसलेले आहे. त्यामुळे या भागातून इकडून -तिकडे जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मागील काळात पोलिसांनी केलेल्या अनेक कार्यवायाहून स्पष्ट होत आहे. मागील काळात झालेल्या विविध कार्यवायात हिमायतनगर येथील विश्वहिंदु परिषद किनवट जिल्हामंत्री किरण सुभाष बिचेवार यांनी तस्करीत पकडलेली जनावरे पुन्हा तस्करांच्या जाळ्यात जाऊ नयेत म्हणून न्यायालयीन लढाई लढली आणि अनेकदा जिंकली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आलेली माहिती आणि होत असलेल्या तस्करीची तक्रार होताच जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जागे होऊन आरोपीना ताब्यात घेऊन जनावरांना कत्तलीपासून वाचावीत आहेत.
याचं वेळी पोलीस व फिर्यादी यांनी वाहन क्रमांक MH 29M 1776 ला ओव्हरटेक करून थांबविले. चौकशी केली असता या वाहनातून जनावरांच्या हाडाची तस्करी होत असल्याचे निदर्षनास आल्याने विश्वहिंदु परिषद किनवट जिल्हामंत्री किरण सुभाष बिचेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिलोली जिल्हा नांदेड येथिल आरोपी शेख अहेमद शेख वय ४२ वर्ष, अब्दुल जलाल अब्दुल रहेमान वय ४५ वर्ष, सय्यद फिरदोस सय्यद कोसर वय २७ वर्ष यांना हिमायतनगर पोलिस अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीना जामिनावर सोडण्यात आले असल्याची माहिती हिमायतनगर ठाण्याचे बिट जमादार बालाजी लक्षठवार यांनी दिली. सादर घटनेचे पुढील तपस पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार करत आहेत.
