हिमायतनगर महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षना मुळे कामारी येथे अवैध रित्या रेतीचे उत्खन सुरू.

हिमायतनगर/परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथे पैनगंगा नदी पात्रातून होत आहे अवैधरित्या रेतीचे उत्खनन. महसूल प्रशासन घेत आहे झोपेच सोंग कामारी येथील नदी पात्रातून दिवस-रात्र रेती उपसा चालू असून महसूल विभागाच्या काही प्रशासकीय अधिकारी यांना हाताशी धरून आर्थिक देवाण-घेवाण करून दिवस-रात्र अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मशिनीने व मजूर लावून वेगवेगळ्या नदीपात्राच्या ठिकाणावरून ट्रॅक्टर व टिपरच्या साहाय्याने दिवस-रात्र अवैध रेती उपसा करून शासनाचा महसूल बुडवित आहे कामारी येथील नदी पात्रातील चोरी झालेल्या रेती उत्खननाची चौकशी होणार का.असे जनतेतून बोले जात आहे.कामारी सज्जातुन अवैध रित्या रेतीचे उत्खनन सुरू असल्याने रेतीचे उत्खनन भ्रष्टाचारा बदल दंडात्मक कारवाई करण्यात यावी व कामारी सज्जाचे मंडळअधिकारी व तलाठी यांची चौकशी करून त्यांना कायमचे निलंबित करण्यात यावे अन्यथा येत्या काही दिवसांत तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांनी तहसीलदार साहेब गायकवाड यांना निवेदन देऊन व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना ई-मेल द्वारा कळविण्यात आले आहे.