
लता फाळके /हदगाव
हिमायतनगर तालुक्यात येत असलेल्या व तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वटफळी शिवारात रुद्राणी कंपनीचे गीटी क्रेशर मशीन आसुन त्या मशीन मध्ये एक कामगार अडकुन मरण पावला असल्याची घटना दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी सकाळी नऊ वाजता घडली आहे
या बाबत तामसा पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की बिहार राज्यातील कुंदन कुमार कुशवाह वय (22 वर्षे) बावीस वर्षे हा तरुण पोटाची खळगी भरण्या करिता मागील सहा ते सात महिन्यापूर्वी रुद्रानी कंपनीत कामाला लागला होता तो नित्याप्रमाणे दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता कामाला गेला होता त्यावेळेस मशीन चालू असताना मशीन मध्ये अचानक बिघाड झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी गेला असता अचानक मशीन चालू झाल्याने तो ग्रीटिंग रेषेच्या पट्ट्यात सापडल्याने कुंदन कुमार कुशवाह वय 22 वर्षे राहणार नगरा तालुका भरा हवाला जिल्हा छपरा(बिहार) यांचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात आकस्मित मुर्तुची नोंद करून
त्यांच्या देहाचे शवविच्छेदन करून डेड बॉडी बिहार राज्यात नेण्यात आली आहे पुढील तपास सपोऊपनि डि.के.बुबुळे हे करीत आहेत.
