
हिमायतनगर प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा सायकल व बैलगाडी मोर्चा संपन्न..
अच्छे दिन चे स्वप्न दाखवीत सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने आज पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव भरमसाठ वाढवले आहेत पेट्रोलने तर शंभरी पार करून दीडशे कडे वाटचाल सुरू केले आहे त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे केंद्र सरकारने देशावर लादलेल्या या महागाईचा एक दिवस विसफोट होऊन यामध्ये मोदी सरकारचा पाय उतार होईल व ” वारे मोदी तेरा खेल. सस्ती दारू महंगा तेल ” माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन जाऊन बघा पेट्रोल पंपावर असे नारे देत आज दिनांक 16 जुलै रोजी हिमायतनगर येथील काँग्रेस कमिटीच्या संपर्क कार्यालया पासून ते तहसील कार्यालय जवळील अभिनव पेट्रोल पंपा पर्यंत नांदेड जिल्ह्याचे नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब,माजी खा.सुभाष वानखेडे व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी बैलगाडी व सायकल मोर्चा काढून राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात केली
यावेळी बोलताना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक गणेश शिंदे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव गगनाला भिडवले आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे जगणे खूप अवघड होत चालले आहे,अगोदर उज्वला गॅस देऊन सर्वसामान्यांची केंद्र सरकारने दिशाभूल केली व नंतर त्याच गॅस चे भाव वाढवले त्यामुळे आता गॅस आणायचा तरी कुठून असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे पेट्रोल ने तर शंभरी पार करून आता सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम हे केंद्र सरकार करत आहे देशावर लादलेल्या या महागाईचा एक दिवस विस्फोट होऊन त्यात मोदी सरकारचा पायउतार नक्की होणार आहे , आणि आता माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन जाऊन बघा पेट्रोल पंपावर असे नारे देत शिंदे त्यांनी ह्या आंदोलनात सहभाग घेतला व काँग्रेस पक्ष नेहमी जनतेच्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर,नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक गणेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समद खान, शिवाजीराव सिरपल्लीकर, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, हिमायतनगर शहराचे माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश वानखेडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड,शेख रहीम सेठ ,सुभाष मामा शिंदे,माजी नगरसेविका सौ.पंचफुला लोणे, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी,युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव माने, रामराव सूर्यवंशी, गोविंद बंडेवार, प्रवीण कोमावार, तालुका उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी,सूरज दासेवार पंडित ढोणे,परमेश्वर भोयर, वैभव पाटील शिंदे,मुखिद खडकीकर सह आदी काँग्रेस व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
