मुख्याधिकारी स्नेहलता स्वामी यांचा पदभार तहसीलदार गायकवाड यांच्या कडे..


👉🏻या बदली मागचे कारण काय ?
👉🏻 महिला दिनी महिला अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली !

हिमायतनगर प्रतिनिधि


मागील आठ महिण्यापुर्वी हिमायतनगर शहरात नगर पंचायतच्या मुख्याधिकारी म्हणून रूजू झालेल्या कर्तव्यदक्ष हदगावच्या नायब तहसीलदार असलेल्या स्नेहलता स्वामी यांचा मुख्याधिकारी या पदाचा पदभार हिमायतनगर शहराचे तहसीलदार गायकवाड यांचेकडे आठ मार्च रोजी सायंकाळी ६.३७ मिनीटाला देण्यात आला
महिला दिनी एका महिला अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली स्वामी यांनी आजपर्यंत हिमायतनगरात केलेल्या उत्कृष्ट कामाची हीच पावती का ? असा प्रश्न शहरातील काही जाणकार नागरिकांन मधून उपस्थित केला जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कार्यालयीन कर्मचारी यांचेकडून माहिती घेतली असता स्वामी यांनी आजपर्यंत हिमायतनगरात केवळ कागदावरच चालणारे वृक्षारोपण प्रत्यक्षात आणले व शहरात १५९४ झाडे लावली.
मागील पाच वर्षांपासून ची थकबाकी टाॅवर , पेट्रोल पंप यांचेवर कारवाई करत वसूल केली.कोरोना काळात शहरात कोरोना पसरू नये यासाठी अतिशय महत्वाची जबाबदारी पेलली, घनकचरा व्यवस्थापनसाठीची जागा प्रश्न न्यायालयीन वादात अडकल्याचे कळताच शहराच्या पुढील दहा वर्षांचा विचार करत अशी जागा स्वतः शोधून जिल्हाधिकारी मार्फत मंजुर करून घेतली.fstp चा कार्यारंभ देऊन ही सुरू न झालेल्या कंत्राटदारास झापाझापी करत काम सुरू करण्यास भाग पाडले , पाणीपुरवठा ची रखडलेली योजना संबंधित यंत्रणा व गुत्तेदार यांचेशी लोकप्रतिनिधी यांचेशी समन्वय साधून मार्गी लावली,शहरातील घनकचरा उचलणे,नाले साफसफाई बाबत जोर दिला, स्वतः फिरून स्वच्छतेची पाहणी केली.माझी वसुंधरा अभियान राबविण्यात पुढाकार घेतला त्यांच्या कल्पनेतून साकारलेला सेल्फी पाॅंईंट मराठवाडाभर पसरला आहे.तर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम नगररचना विभागाशी समन्वयाने कन्सल्टन्सी यांनी प्रत्यक्ष काम करण्यास भाग पाडले. हिंदू स्मशानभूमी चे अर्धवट राहिलेले काम नोटीस देऊन गुत्तेदाराकडून पुर्ण करून घेतले. अर्धवट राहिलेल्या अग्निशमन इमारती बाबत ही संबंधित अभियंता यांचेमार्फत पाहणी करून कंत्राटदार यांना दंडात्मक कायदेशीर कारवाई ची नोटीस जारी केली.कर्मचारी यांना शिस्त लावत जनतेची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घेतली.अभ्यांगताचे प्रश्न जाणुन ते मार्गी लावत तर नगरसेवक यांचेशीही त्यांची वागणूक सदैव चांगली होती सर्वांच्या मनात त्यांचे कामाप्रती आदर होता. कर्मचारी यांच्या सदैव पाठीशी राहणारे व चुकल्यास कान पिळणारे , शिस्तप्रिय अधिकारी असल्याचे कार्यालयीन अधीक्षक मुक्ता कांदे सह , अभियंता रफिक ,बाच्छे ,डावरे आदींसह शेख महेबूब यांनी सांगितले.शेख महेबुब यांनी तर स्वतः च्या सेवानिवृत्तीचा प्रश्न त्यांनी अत्यंत कुशलतेने मला न दुखवता हाताळल्या चे सांगितले.हिमायतनगर शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या कनकेश्वर तलाव उद्यान विकसित करणेसाठी ही त्यांनी विशेष महेनत घेऊन प्रस्ताव पाठविल्याचे ही कळले. प्रभाग रचना आरक्षणाचा कार्यक्रम ही त्यांनी अतिशय कौशल्याने अभ्यासपूर्ण पद्धतीने हातळल्याचे अनेक नगरसेवक सांगत होते. मतदार यादी वरील आक्षेपावर ही वार्डात फिरून नियमानुसार पंचनामे करुन निर्णय घेणेबाबत आदेशीत करून वार्ड तीन मध्ये त्या स्वतः आल्याचे कर्मचारी यांनी सांगितले. अशा कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा तडकाफडका पदभार काढल्यामूळे कर्मचारी व काही हिमायतनगर वासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे

चौकट

या बदली मागचे कारण काय ?

हिमायतनगर शहरात कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मुख्याधिकारी स्नेहलता स्वामी यांची महिला दिनीच तडकाफडकी बदली करून त्यांचा अतिरिक्त असलेला मुख्य अधिकारी पदाचा कारभार काढून घेण्यात आला त्या जागी हिमायतनगर शहराचे तहसीलदार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली या बदलीमागे नेमके काय कारण ? आहे हे अद्यापही हिमायतनगर शहरातील जनतेला कळले नाही