हिमायतनगरातील बोगस कामाचं श्रेय घेण्यास कुणीच पुढं येईना – बालाजी बलपेलवाड

k

प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

घरकुलाचा चौथा हप्त्याच्या निधीवरून श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर चढाओढ
मागील ५ वर्षात कधी नव्हे तेवढी बोगस कामे करून स्वतःचा विकास करून घेतला
हिमायतनगर| नगरपंचायतीच्या पंचवार्षिक काळात तत्कालीन सत्ताधार्यांनी शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीची पुरती वाट लावली आहे. खरे पहात शहरातील आवश्यक गरजा पूर्ण करणे महत्वाचे असताना केवळ मलिदा लाटण्याच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेतला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्याने उघड झालेली बोगस कामे जनतेनी उघड्या डोळ्यांनी पहिली आहेत. सत्तेत असताना जनतेच्या कामाकडे पाठ फिरवायची आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर माझ्यामुळं हे झालं असे दाखवून दिशाभूल करायची हाच कित्ता हिमायतनगरात गिरविला जात आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे मागील वर्ष भरपासून घरकुल धारकांच्या चौथ्या हप्त्याचा निधीचा प्रश्न ऐरणीवर असताना आमदार-खासदारांनी केलेल्या प्रयत्नामुळे तो निधी उपलब्ध होणार आहे. याचे श्रेयवाद सत्ता भोगून पायउतार झालेले काही लोकप्रतिनिधी घेण्यासाठी धडपडत असल्याचे सोशल मीडियावर पाहावयास मिळते आहे. तश्याच प्रकारे विकास कामाच्या नावाखाली झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाचे श्रेय कोणताही लोकप्रतिनिधी का घेत नाही ? असा सवाल प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बालपेलवाड यांनी विचारला आहे. निधी कोणीही आणले तर त्यांनी जनतेवर उपकार केलं नाही… जनतेने त्यांना ५ वर्षासाठी याच कामासाठी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे हे माझ्याच पाठपुराव्यामुळं झालं हे म्हणने चुकीचे आहे. जनतेनं निवडून दिले नसते तर काय भाकरी आणल्या असता काय…? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित करून तत्कालीन पुढाऱ्यांच्या भूलथापांना ठार देऊन नये. अन्यथा मागील ५ वर्षाच्या काळात झालेल्या बोगस कामाची पुनरावृत्ती होऊन होऊन शहरात वाहणारी गटारगंगा कायम वाहती राहील. आणि भ्रष्टाचारकरणारे मालामाल होतील. यासाठी सक्षम, उच्चशिक्षित, जनतेची इमाने इतबारे काम करणार्यांना नगरपंचायतीच्या खुर्चीवर बसवायला हवं असे मत त्यांनी व्यक्त केलंय.