
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून आज हिमायतनगर तालुक्यात दोन रूग्नवाहीनी उपलब्ध करून देण्यात आले त्यावेळी आमदार यांनी व्यकतव्य केली की मानव जीवन हे अनमोल आहे
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे सार्वजनिक व सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या हिताची जोपसना करण्यासाठी अविरत झटणारे हदगाव /हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. मा. माधवराव पाटील जवळगावकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या आमदार निधीतून हिमायतनगर तालुक्यातील सरसम व चिंचोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका खरेदी करून उपलब्ध केल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकटामध्ये मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी करीता रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत अवस्थेतील रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने रुग्ण व सर्वसामान्यांची आरोग्यविषयक मोठी सोय झाली आहे. रुग्णवाहिकांचा छोटेखानी लोकार्पण सोहळा कोरोना नियमांचे पालन करीत आमदार मा. श्री माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शुभहस्ते आज दिनांक 02-05-2021 रोजी करण्यात आले. या प्रंसगी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश प्रभाकरराव पोहरे, डॉ. अनिल पोपुलवार, डॉ. सचिन जोयजड,डॉ. सुषमा शंकरे, आशा समन्वय श्री कृष्णा चौधरी, श्रीमती व्हि.आर. कदम, श्रीमती तुंगेवाड, जि.प. सदस्य श्री जोंगेद्र नरवाडे, माजी जि.प. सदस्य सुभाष अल्ला राठोड , पत्रकार श्री गोपतवाड, तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर,श्री सुर्यवंशी सर, वाहनचालक श्री मोहिते व श्री नादर उदघाटन प्रसगी हजर होते.
