
प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर
…अहो खरेच मड्याच्या टाळूवरील लोणी ठेकेदाराने लाटले..?
👉🏻नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी !
हिमायतनगर. प्रतिनिधी :- शहरातील लकडोबा चौकात असलेल्या हिंदू समाज स्मशानभूमी विकसित करण्याचे काम २२ लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात आले. सदरचे काम दोन वर्षानंतर पूर्ण झाले खरे, मात्र हे काम करताना ठेकेदाराने निकृष्ठ पद्धतीने आणि चौथऱ्याची उभारणी न करता अर्धवट ठेवल्याने आज घडीला अंत्यसांकर करण्याच्या ठिकाणी मोठी झाडे उगवली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठेकेदाराने अर्धवट काम ठेऊन मड्याच्या टाळूवरचे लोणी खाल्लंय कि काय..? अशी शंका नागरीकातून व्यक्त केली जात आहे. परिणामी मयताच्या प्रेताचे अंत्यसंस्कार स्मशान भूमी परिसरातील मोकळ्या जागेत करण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे ठेकेदाराने मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची कोणतीच कसर बाकी ठेवली नसल्याचा आरोप अंत्यविधीला आलेल्या नागरीकातून करण्यात आला आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाकडून हिमायतनगर शहरातील हिंदू- मुस्लिम स्मशान भूमीसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. मागील ३ वर्षांपूर्वी नगरपंचायती अंतर्गत लकडोबा चौकातील हिंदू समाज स्मशानभूमी विकसित करण्यासाठी २२ लक्ष रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला होता. या विकास कामाचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते झाले. मात्र मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय लागलेल्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी आपला स्वार्थ साधला. परिणामी स्मशान भूमीचे काम ठेकेदाराने निकृष्ट करून अर्धवट ठेवल्याचे दिसत आहे. याबाबत अनेक तक्रारीं झाल्या, मात्र ठेकेदाराने आपल्या मर्जीने स्मशान भूमीचे काम केल्याने येथील स्मशान भूमीच्या संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत. एव्हीवढेच नाहीतर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेल्या २ शेडमध्ये असलेल्या चौथऱ्याच्या रिकामे जागी चक्क लिंबाची झाडे उगवून ४ फूट एवढी वाढली आहेत. यावरून स्मशाहून भूमीचा विकासाकडे नगरपंचायत प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच प्रेताचे अंतिम संस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडचे काम पूर्ण झाले असले तरी या ठिकाणी चौथऱ्याची उभारणी केली गेली नसल्याने विकास काम अर्धवट राहील्याचे दिसून येत आहे. परिणामी स्मशान भूमीचा काही एक उपयोग मयताच्या नातेवाईकांना झाला नाही. कारण या ठिकाणी प्रेताचे अंत्यसंस्कार करण्यासाठी २ शेडची उभारणी करण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी मयताला अग्नी देण्यासाठी चौथऱ्याची निर्मिती केली गेली नसल्याने लाकडे रचून मयताच्या प्रेताला अग्नी देता येत नसल्याने वैकुंठाला गेलेल्या व्यक्तीच्या प्रेताचे दहन स्मशान भूमीतील मोकळी जागेवर करण्याची नामुष्की नागरिकांवर आली आहे. एवढेच नाहीतर या ठिकाणी पाण्याची सोय नाही, बसण्याची सोय नाही, विजेची सोय नाही, चिताग्नीसाठी धातूची जाळी (चौथरा) नाही, यासह अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना कमालीचे हाल सोसावे लागत आहेत. धक्कादायक म्हणजे याकडे नगरपंचायत प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सदरचे काम अर्धवट ठेऊन गुत्तेदाराने व नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी, पदाधिकाऱ्याने मड्याच्या टाळूवरील लोणी खाल्लंय कि काय..? अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींना हिमायतनगर शहरातील जनता येणाऱ्या नगरपंचाय निवडणुकी मध्ये माफ करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल हे मात्र तितकेच खरे आहे
चौकट
दि.०९ रोजी शहरातील युवक सखाराम डाके यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधी येथील लाकडोबा चौकात असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये सायंकाळी ५ वाजता करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी अंत्यविधीला उपस्थित झाले होते. प्रेताचा अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना शेडच्या अर्धवट कामामुळे मोठा अडचणींचा सामान करत मोकळया जागेत प्रेतावर अंत्यसंस्कार करावे लागले आहे. गुत्तेदार व पदाधिकाऱ्यांची अनास्था यामुळे मरणानंतरही प्रेताला व येथे येणाऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागत लागत आहेत, अशी प्रतिक्रीया अनेकांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे.
