
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी
हादगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती पंप विजपुरवठा सद्या खंडीत केला जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे हादगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांनी महावितरण चे मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर का शेतकर्यांचे शेतीतील विजपुरवठा खंडीत केला तर हाताला आलेले पिंक एका पाण्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होईल त्याच्या उत्पन्नात घट होऊ शकतो याची दखल देखील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे यावर्षी शेतकरी अतिवृष्टी मुळे संकटात सापडला चौहीबाजुने त्यांची पिळवणूक केली जाते सरकार अनुदान जाहीर करतो आणि खात्यात मात्र झिरो बजेट राहतो राज्य सरकारने शेतकऱ्यांना ८०००म्हणुन ८००रुपये देखील टाकलेले नाही आणि ऊर्जा मंत्री विज भरु नका म्हणतो आणि हाळुच विज तोडणी चे आदेश देतो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही शेतकऱ्यांचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागणी करतो जर का विजपुरवठा सुरळी नाही केला तर लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करू असा इशारा देखील लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे व महावितरण परिमंडळ कार्यालय नांदेड यांना निवेदन देण्यात आले
