रस्त्यावरील मास विक्री ची दुकाने तात्काळ हटवा – नागरिक संतप्त

रत

लता फाळके /हदगाव

हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील हदगाव – बाळापुर हा मुख्य रस्ता आहे मुख्यतः याच मार्गावरून जास्त वाहतूक असते. परंतु याच मार्गावर मास विक्रीची काही दुकाने विनापरवाना सुरू आहेत त्यामुळे दुकाने तातडीने बंद व्हावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. गावातील मुख्य रस्त्यावर विनापरवानगी दुकाने थाटण्यात आल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावरही वाढला आहे म्हणून त्याचा त्रास वाहनधारकांना विशेषत: दुचाकीस्वारांना होण्याचे प्रमाण वाढले आहे वाहन चालविताना कुत्रे मध्ये आल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत या कुत्र्यांचा परिसरातील व्यापाऱ्यांना ही त्रास आहे. मास विक्रेत्यांकडून फेकण्यात येणाऱ्या घाणीमुळे परीसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे त्याला लागून जवळ श्री हनुमान मंदिर व वैदू समाजाचे मंदिर आहे त्या भागातही अस्वच्छता निर्माण होत आहे. मास विक्रीची दुकाने तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ही दिले आहे या निवेदनावर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भगवानराव शिंदे कृषी व्यापारी विनायकराव कदम तसेच वैदू समाजातील अनेक ग्रामस्थांच्या व इतर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.