हिमायतनगर अग्निशमन इमारतीचे अर्धवट काम करून, लाखो रुपयांचा केला भ्रष्टाचार

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी

श या कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्य अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी ?
महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियाना अंतर्गत सन 2016-17 मध्ये शहरातील अग्निशामक दलाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 79 लाख 18 हजार 400 रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारतर्फे प्राप्त झाला होता त्यात महाराष्ट्र अग्निशमन योजनेअंतर्गत कर्मचारी निवासस्थान बांधकाम, कार्यालय व निवासस्थान बांधकाम व कर्मचारी निवास स्थानाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा निधी प्राप्त झाला होता त्या निधीमध्ये लाखो रूपयाचा भ्रष्टाचार करून ते काम अर्धवट ठेऊन शासनाची फसवणूक करत त्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नागेश शिंदे यांनी केला आहे
याची जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशात च्या 20 अटी व शर्ती प्रमाणे त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे अशी मागणी एका लेखी तक्रारी नुसार हिमायतनगर शहरातील कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे
शहरातील नगरपंचायत च्या वतीने तालुक्यात संकटकालीन मदतीसाठी अग्निशामक केंद्राची भव्य इमारत निर्माण करण्याचे काम तत्कालीन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व मागील काळातील मुख्याधिकारी यांनी हाती घेतले होते परंतु नगरपंचायती च्या नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपताच नगरपंचायत मध्ये सत्ता बदल झाल्यानंतर निर्माणाधीन असलेल्या अग्निशमन केंद्राचे काम जशास तसे थातूरमातूर पद्धतीचे करून इस्टिमेट ला बगल देत, बाहेरून कलरिंग करून आत मध्ये जशास तसे ठेवून हे काम पूर्ण झाल्याचे सांगून मागील मुख्याधिकारी यांनी काही राजकीय नेते मंडळी ला हाताशी धरून जनतेची व प्रशासनाची फसवणूक करून प्रशासनाचे हे काम पूर्ण केले आहे असे सांगून ह्याची देयके काढली यावरून या कामात लाखो रूपयाचा अपहार झाल्याचे निदर्शनास येत आहे शहराच्या ठिकाणी अग्निशामन दलाची व्यवस्था नसतानाही नगरपंचायत मालमत्ता करांमधून अग्निशमन कर वसूल करत आहेत व इतर अनेक प्रकरणाची माहिती माहितीच्या अधिकारात अनेकांनी ही माहिती मागवली पण येथील नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून शहरात अशा अनेक विकास कामांना निधी प्राप्त झाला होता ही कामे शासकीय गुत्तेदा राच्या नावे घेऊन मागील काळातील मुख्य अधिकारी व मा.नगराध्यक्ष व काही नगरसेवकांशी संगणमत करून ह्या इमारतीचे निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे ह्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून नांदेड जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नियम व अटी च्या आदेशाप्रमाणे हिमायतनगर येथील अग्निशामक इमारतीचे काम झाले नाही त्यामुळे मागील काळात कंत्राटदारास जी देयके अदा करण्यापूर्वी संविधानिक कपाती नुसार कंत्राटदाराने प्रचलित नियम VAT,ESI,EPF,MWA,labor act प्रमाणे स्थायी निर्देश क्रमांक 30 चे पालन करून वरील सर्व गोष्टीची खात्री करून ही देयके देण्यात आली का ? याची सुद्धा मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित गुत्तेदा राविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नागेश शिंदे यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे