वाळकेवाडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात गाय ठार, व नागरिकांमद्ये भीतीचे वातावरण

नांदेड :-हिमायतनगर तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून, वनपरिक्षेत्र हिमायतनगर अंतगर्गत येणाऱ्या दुधड परिसरात बिबट्यांचा सुसुळाट आझाला आहे
शनिवारी मध्यरात्री मौजे वाळकेवाडी येथे माधव धुमाळे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गाईला बिबट्याने आपले भक्ष बनविले आहे…
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागातील अधिकारी, घटनास्थळी उपस्थित झाले व घटनेचा पंचनामा करण्यात आला या वेळी उपस्थित वनरक्षक घोगरे साहेब, व त्यांचे सहकारी होते..
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत.
सादर बाब विनविभागाने गांभीर्याने लक्षात घेऊन तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे