हिमायतनगर येथील बालाजी शाळेवर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती माजी आमदार आष्टीकर यांनी केली साजरी

प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर

हिमायतनगर प्रतिनिधी शहरातील बोरगडी रोड वर असलेल्या बालाजी माध्यमिक विद्यालय शाळेवर आज आज दि.23 फेबुवारी रोजी हिमायतनगर येथील नगर पंचायत निवडणुकी संदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली होती त्या बैठकी पूर्वी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी केली

अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यानी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमाने समाज सुधारणा करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून हिमायत नगर येथील नगर पंचायत निवडणुकी संदर्भात शिवसेना कडून काय काय नियोजन केले जाईल ह्या संदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी असे सांगितले की येणाऱ्या दि.1 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शहरातील सर्व वार्डातील शिवसेना कडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उपस्थित राहून आपले मत पक्षाला कळवावे ह्या येणाऱ्या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ कोकाटे हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे,नगराध्यक्ष कुणाल राठोड, किसानसेना तालुका प्रमुख प्रकाश जाधव,तालुका संघटक संजय काईतवाड,उपतालुका प्रमुख विलास वानखेडे,शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे,सावन डाके, संट्टी कपलवाड,अनिल पाटील सिरपल्ली कर,विठ्ठल ठाकरे,राम नरवाडे, जफर लाला,इद्रिस शेवाळ कर,कपिल हराळे,नागेश शिंदे,अमोल धुमाळे,गजानन पाळज कर,विपुल दंडे वाड, अमोल जोगदंड,पांडुरंग इंगळे,संतोष साबळकर, सह आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते