
लता फाळके /हदगाव
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक- 2021.
हदगांव तालुका सोसायटी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मा. नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या प्रसंगी सत्कार करतांना माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. माधवराव पाटील जवळगांवकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी आ. वसंतराव चव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख दता कोकाटे,
माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील हरडफकर, नगरसेवक फिरोज पठाण विधानसभा अध्यक्ष संदीप शिंदे, पिंपरखेड चे सरपंच पिंटू पाटील मार्केट कमिटी संचालक पांडू खंदारे इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मा. नागेश पाटील यांच्या निवडीमुळे हदगांव – हि. नगर मतदार संघातील महाविकास आघाडी चे कार्यकर्ते तसेच नागेश पाटील समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला व माजी आमदार नागेश पाटील तसेच आमदार माधवराव पाटील यांचे सर्वानी अभिनंदन केले.
