
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव
ग्रामसंवाद सरपंच संघटना तालुकाध्यक्षपदी निलेश पाटील अंबाळकर
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्व आजी माजी सरपंच एकत्र येऊन राजकारण विहिरीत निस्वार्थ हेतूने प्रत्येक गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रामसंवाद सरपंच संघाची स्थापना करण्यात आली आहे या संघाच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी निलेश पाटील अंबाळकर सरपंच ग्रामपंचायत अंबाळा यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी स्वागत केले हदगाव तालुक्यातील बऱ्याच सरपंचाने अभिनंदनाचा वर्षाव केला व येत्या काही दिवसात सर्व तालुक्याची कार्यकारिणी तयार करून सरपंच संघटनेच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकासासाठी सरपंचाचा विविध मागण्यासाठी विविध प्रकारचा लढा देणार आहे संघटनेची तालुका कार्यकारिणी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉकडाऊन संपताच तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांचा एकत्र मेळावा घेऊन विविध समस्या जाणून घेऊन या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने लढा देणार आहे असे मत संघटनेचे तालुकाप्रमुख निलेश पाटील अंबाळकर यांनी व्यक्त केले आहे
