

लता फाळके/ हदगाव
मागील वर्षभरापासून जगात कोरोना ने हाहाकार माजविला आहे त्यातच महाराष्ट्र हा कोरोना
चा हॉटस्पॉट ठरल्याने दररोज लाखो रुग्ण वाढत आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने रुग्णांना सुविधा मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत काही ठिकाणी प्लाज्मा तर काही ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे ऑक्सिजन, व्हेंटीलेटर साठीही रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागतो शासकीय यंत्रणा कोलमडून पडली आहे परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून कोरोना
ग्रस्तांना जीवनदान देणारे महत्त्वाचे कार्य केले जात आहे कोरोना ग्रस्तांना बेड मिळवून देणे ऑक्सीजन मिळवून देणे रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी एकाच दिवशी 35 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते याचबरोबर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यापर्यंत सहकार्य या ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ व त्यांची टीम रात्रंदिवस करत आहे सामाजिक कार्याच्या भावनेतून
कोरोना ग्रस्तांची सेवा या कठीण काळात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन करत असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास न्याय दिला जाऊ शकतो या भावनेतून या ग्रुपमध्ये तरुणांची मोठी संख्या आकर्षित होत आहे केंद्र सरकार व राज्य सरकार मधील वाद आणि या वादात अडकलेले सामान्य रुग्ण मात्र विनाकारण भरडल्या जात आहे त्यामध्ये असे सामाजिक कार्याचा वसा घेतलेले तरुण तडफदार प्रवीण पिसाळ
कोरोना रूग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. रात्रंदिवस 24 तास कोणाचाही मेसेज आल्यास जात, धर्म, पक्ष कुठलाही भेदभाव न पाहता प्रवीण पिसाळ आणि त्यांच्या टीमचे सर्व सदस्य निरपेक्ष भावनेने महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी रुग्णास त्याच्या सेवेसाठी तात्काळ तत्पर असतात त्यामुळे सध्या या रुग्णांना राजकीय नेत्यांपेक्षा WMO ह्या ग्रुप वर आपली अडचण सांगणे सोपे वाटते कारण आपल्याला मदत ही नक्कीच मिळणार याची शाश्वती असते ह्या ग्रूप मध्ये असलेले सर्व सदस्य एकमेकांशी संपर्क साधून त्या रुग्णाच्या अडचण कसे दूर करता येईल यासाठी सदैव तत्पर आहेत या सर्व सामाजिक कार्यामुळे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सामाजिक क्षेत्रात तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणारी मोठी लोक चळवळ उभा करणारा ग्रुप म्हणून कौतुकास पात्र ठरत आहे याचबरोबर कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्याचे कामही या ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे तर कोरोना विरोधात लढण्यासाठी उपलब्ध असणारी लस घेण्या साठी आवाहन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कडून केले जात आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन, टीकात्मक वापर न करता वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रवीण पिसाळ यांनी आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कार्य करण्यासाठी सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो हे दाखवून देत आहेत. या ग्रुपचा आदर्श समाज माध्यमातील इतर वापरकर्त्यानी घेतला पाहिजे असे भावना निर्माण होत आहे. ह्या ग्रुपचे अध्यक्ष प्रविण पिसाळ हे राजकीय चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांना शाब्दिक शस्त्रांनी फटकारत असल्याने या ठिकाणी सर्वजण आपले राजकीय निष्ठेचे जोडे बाहेर ठेवून सामाजिक भावनेतून मोठं काम करत आहेत. चमकोगिरी करणाऱ्यांना प्रवीण पिसाळ आपल्या शैलीत शालीतून दगड मारतात त्यामुळे चमकोगिरी करणाऱ्यांना सुद्धा या ग्रुप वर सावधानतेने कमेंट कराव्या लागतात सध्याच्या काळात सोशल मीडियावर अशी ग्रुप तयार होणे ही काळाची गरज आहे.
